एकनाथ शिंदे हे संवेदनशील मुख्यमंत्री – विलासराव घुमरे
करमाळा (बारामती झटका)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अत्यंत संवेदनशील मुख्यमंत्री असून विशेषत: आरोग्याच्या प्रश्नात अडचणीत आलेल्या रुग्णाला मदत करण्याची त्यांची भावना व ते करत असलेले प्रयत्न यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक रुग्णाला आपल्याला मदत करणारा कोणीतरी आहे, अशी विश्वासाची भावना एकनाथ शिंदे यांच्या रूपाने निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांनी दिली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा उपजिल्हा रुग्णालय व श्री कमला भवानी ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, तालुकाप्रमुख देवानंद बागल, शहर प्रमुख संजय पाटील, युवा सेनेचे निखिल चांदगुडे, राहुल कानगुडे, विशाल गायकवाड, वैद्यकीय मदत पक्षाचे रोहित वायबसे, नागेश शेंडगे, शिवकुमार चिवटे, आजिनाथ वस्ताद कोळेकर, प्रदीप बनसोडे, संजय जगताप, केशव साळुंखे, शिवसेना शाखाप्रमुख निलेश चव्हाण, पांडुरंग जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना विलासराव मोरे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारा व सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा मुख्यमंत्री या महाराष्ट्र राज्याला मिळाला आहे. सामान्य माणूस कष्टकरी, कामगार थेट मुख्यमंत्र्याला वर्षा बंगल्यावर जाऊन भेटू शकतो, आपल्या अडचणी मांडू शकतो, असा सर्वसामांन्यात मिसळणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे. त्यांच्या संवेदनशील व्यक्तिमत्त्वामुळे महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्राला बळकटी मिळाली असून सर्वसामान्य जनतेला आपल्याला आजारी पडल्यानंतर कोणीतरी मदत करणारा आहे, अशी भावना एकनाथ शिंदे यांच्यामुळे निर्माण झाली असल्याचे मत व्यक्त केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
It’s very interesting! If you need help, look here: hitman agency
This article was a fantastic blend of information and insight. It really got me thinking. Let’s dive deeper into this topic. Click on my nickname for more thought-provoking content!
I like this blog very much, Its a real nice place to read and receive info.Raise blog range
Tychina Lottero leconte