आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांचा पंढरपूर तालुक्यातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन दौरा कार्यक्रम…
शिवरत्न उद्योग समूहाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर उद्योजक शिवतेसिंह मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती…
अकलूज ( बारामती झटका )
विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या आमदार निधीतून पंढरपूर तालुक्यातील विविध विकासकामांचा भूमिपूजन शुक्रवार दि. ३१/०३/२०२३ रोजी झंजावाती विकासकामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवरत्न उद्योग समूहाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर उद्योजक शिवतेसिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या आमदार निधीतून पंढरपूर तालुक्यातील आव्हे, नांदोरे, पेहे, शेवते, जळोली, उंबरे, पागे, कान्हापुरी, करोळे असा सकाळी ०९.३० वाजले पासून दुपारी ४ वाजेपर्यंत उद्घाटनाचा कार्यक्रम आहे. दुपारी १२ ते २ पेहे येथे जनतेसाठी राखीव वेळ राहणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng