जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या आषाढी पालखी वारीचे आयोजन
देहू (बारामती झटका)
श्री संत तुकाराम महाराज यांच्या आषाढीवारी ३३८ व्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने जाहीर झाले आहे.
श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा दि. १०/०६/२०२३ रोजी पालखी प्रस्थान सोहळा असून इनामदार साहेब वाडा श्रीक्षेत्र देहू येथे मुक्काम असणार आहे. रविवार दि. ११/०६/२०२३ रोजी आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिरात पालखीचा मुक्काम असणार आहे. सोमवार दि. १२/६/२०२३ रोजी नाना पेठ पुणे श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरे येथे मुक्काम असणार आहे. मंगळवार दि. १३/६/२०२३ रोजी नाना पेठ पुणे श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर येथे संपूर्ण दिवस पालखी असणार आहे. बुधवार दि. १४/६/२०२३ रोजी लोणी काळभोर येथील श्री विठ्ठल मंदिरात पालखीचा मुक्काम असणार आहे. गुरुवार दि. १५/६/२०२३ रोजी यवत पालखी तळ श्री भैरवनाथ मंदिरात पालखीचा मुक्काम असणार आहे. शुक्रवार दि. १६/६/२०२३ रोजी वरवंड येथील श्री विठ्ठल मंदिरात पालखीचा मुक्काम असणार आहे. शनिवार दि. १७/६/२०२३ रोजी उंडवडी गवळ्याची येथे पालखीचा मुक्काम असणार आहे. रविवार दि. १८/६/२०२३ रोजी बारामती येथील शारदा विद्यालयाच्या प्रांगणात पालखीचा मुक्काम असणार आहे.
सोमवार दि. १९/६/२०२३ रोजी सणसर येथे मुक्काम असणार आहे. मंगळवार दि. २०/६/२०२३ रोजी अंथुर्णे येथील पालखी तळावर मुक्काम असणार आहे बुधवार दि. २१/६/२०२३ रोजी निमगाव केतकी पालखी तळ येथे मुक्काम असणार आहे. गुरुवार दि. २२/६/२०२३ रोजी इंदापूर येथील पालखी तळ येथे मुक्काम असणार आहे. शुक्रवार दि. २३/६/२०२३ रोजी सराटी येथे मुक्काम असणार आहे. शनिवार दि. २४/६/२०२३ रोजी अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालय येथे पालखीचा मुक्काम असणार आहे. रविवार दि. २५/६/२०२३ रोजी बोरगाव येथे मुक्काम असणार आहे. सोमवार दि. २६/६/२०२३ रोजी पिराची कुरोली येथे मुक्काम असणार आहे. मंगळवार दि. २७/६/२०२३ रोजी वाखरी येथे पालखीचा मुक्काम असणार आहे. बुधवार दिनांक २८/६/२०२३ रोजी श्री क्षेत्र पंढरपूर श्री संत तुकाराम महाराज मंदिर येथे मुक्काम असणार आहे. गुरुवार दि. २९/६/२०२३ रोजी पंढरपूर येथे सर्व भाविक एकत्र येऊन आषाढी सोहळा रंगणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Instalación simple y descarga gratuita, no se requieren conocimientos técnicos y no se requiere raíz.Grabacion de llamadas, Grabacion de entorno, Ubicaciones GPS, Mensajes Whatsapp y Facebook, Mensajes SMS y muchas características mas. https://www.mycellspy.com/es/tutorials/
Very insightful article! Its great to see such well-researched content. Lets talk more about this. Click on my nickname for more!