पिसेवाडी येथे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्तुत्य उपक्रम
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिव्यांगांना मोफत अपंग सर्टिफिकेटचे वाटप..
पिसेवाडी (बारामती झटका)
पिसेवाडी ता. माळशिरस येथे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिव्यांग बांधवांना अपंग सर्टिफिकेटचे मोफत वाटप करण्यात आले.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुकाध्यक्ष अजित (भैय्या) बोरकर, धनंजय चव्हाण, माजी सरपंच शैलेश भाकरे, जनसेवा संघटना पोलीस पाटील सुमंत गायकवाड, मुसा आतार, राष्ट्रवादीच्या अश्विनीताई भानवसे, सुनील गायकवाड, मगन काळे, शंकर पिसे, दादा म्हैत्रे, बाळू गायकवाड, रामचंद्र पिसे, शंकर वाघमारे, सतीश पिसे, भागवत पिसे, बाळू पिसे, गणपत म्हैत्रे, शंकर वाघमारे, संदीप पिसे, उमेश भाकरे, इलाई आतार, सुधीर शेंडे आदींसह अनेक कार्यकर्ते आणि अपंग बांधव उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विधानसभा प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साहिल आतार यांनी केले होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng