बारामती झटका इफेक्ट !!!! माळशिरस येथील महिबूब सुभानी यांच्या दर्ग्याने मोकळा श्वास घेतला
माळशिरसमध्ये भयानक प्रकार उघडकीस, प्रशासनाची डोळ्यावर पट्टी
मुस्लिम दर्गाजवळ चक्क चप्पलांचा साठा अशा मथळ्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते.
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस शहरामध्ये महिबुब सुभानी यांची दर्गा आहे. ही दर्गा पूर्वीपासून आहे. सध्या या दर्ग्याच्या चारी बाजूंनी अतिक्रमण केले आहे. तर दर्गाच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी चप्पलांचे दुकान मुबारक जैनुद्दिन मणेरी यांनी टाकले असून याने चपलांचे गोडाऊन महीबुब सूभानी या दर्गाच्या आताच केले असून यामुळे मुस्लिम बांधवासह हिंदू समाजाच्याहि भावना दुखावल्या जात आहेत, अशी बातमी प्रसिद्ध केलेली होती. वृत्त प्रसिद्ध होताच संबंधितांनी दर्ग्यातील साहित्य काढून टाकलेले असून सध्या महबूब सुभानी यांचा दर्गा मोकळा श्वास घेत आहे. बारामती झटका वृत्ताची दखल घेतलेली असल्याने समाजामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
याबाबतचे निवेदन माळशिरस नगरपंचायत व तहसीलदार यांना मुस्लिम समाजाच्यावतीने देण्यात आले होते. जर संबंधीत अतिक्रमण काढले नाही तर मुस्लिम समाजाच्यावतीने माळशिरस तहसीलवर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी महिती रशीद इन्नुस मनेरी यांच्यासह मुस्लिम बांधव यांनी दिली होती. दर्ग्यातील अतिक्रमण निघालेले असल्याने प्रशासन व बारामती झटका वृत्ताबद्दल भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होत आहे.
बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनल प्रसारमाध्यमातून समाजामधील परखड, निर्भीड व वास्तववादी बातम्या देवून उत्कृष्ट कार्य करीत असल्याने जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng