मोहिते पाटील व जानकर कुटुंबीयांचे जिव्हाळ्याचे संबंध घट्ट

तरंगफळ (बारामती झटका)
तरंगफळ ता. माळशिरस येथील दिव्यांग संघटनेचे नेते गोरख जानकर यांचे नातू व नातींचे तसेच ग्रामपंचायतीच्या विद्यमान जेष्ठ सदस्या श्रीमती जगूबाई जानकर यांच्या पणतू व पणतीच्या बारश्याचा समारंभाचे मोठ्या शाही थाटात आयोजन करण्यात आले होते. यावेळी माळशिरस तालुक्याच्या माजी पंचायत समिती सभापती सौ. वैष्णवीदेवी अर्जुनसिंह मोहिते पाटील आवर्जून उपस्थित होत्या. तसेच तरंगफळचे माजी सरपंच व बीज उत्पादक सहकारी संस्थेचे व्हाईस चेअरमन सुजित तरंगे हेही उपस्थित होते.
यावेळी वैष्णवीताईंनी जानकर कुटुंबीयांना शुभेच्छा देऊन गोड बाळांचे कौतुक केले व आशीर्वाद दिला. यावेळी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी सर्वांचे स्वागत गोरख मारुती जानकर व सौ. रत्नमाला गोरख जानकर यांनी केले. तसेच यावेळी राजाभाऊ तरंगे पाटील, किसन काळे, दादासो नायकुडे, अनिल कोळेकर, महेश वावरे, मंगेश पिंगळे, सागर बनसोडे, मधुकर नारले, युवराज नरोटे, स्वस्त धान्य दुकान संघटनेचे अध्यक्ष महादेव तरंगे, परमेश्वर बनसोडे यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng