कृषिवार्ताताज्या बातम्यासामाजिक

सर्कल सुजित शेळवणे यांना निलंबित करा, अन्यथा आमरण उपोषण

लऊळ (बारामती झटका)

माढा तहसील अंतर्गत लऊळ मंडळमध्ये कार्यरत असताना शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक तसेच शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन काम न करणे जमिनीच्या वादात बेकायदेशीरपणे नोटीस पाठवून शेतकऱ्यांना धमकवणे, कोतवाल भरतीमध्ये उमेदवारांकडून पैसे घेणे, कोणतेही काम पैसे घेतल्याशिवाय न करणे, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करणाऱ्या मंडळ अधिकारी सुजित शेळवणे यांना तात्काळ निलंबित करा, अशी मागणी पालवण गावचे तंटामुक्त अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते भारत साळुंखे यांनी उपविभागीय अधिकारी माढा, विभाग कुर्डूवाडी यांच्याकडे निवेदन देत केली आहे.

सर्कल सुजित शेळवणे यांची सखोल चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा ६ नोव्हेंबर रोजी शेकडो अन्यायग्रस्त शेतकरी नागरिकांना घेऊन आमरण उपोषण करणार आहोत, असे माहिती देण्यात आलेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button