मोटेवस्ती येथे माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या स्नेह संमेलन कार्यक्रमाचे आयोजन
मोटेवस्ती (बारामती झटका)
मोटेवस्ती ता. माळशिरस येथे २००३-२००४ या बॅचच्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेहसंमेलन २०२३ या कार्यक्रमाचे आयोजन गीताई प्रशाला मोटेवस्ती, ता. माळशिरस येथे शुक्रवार दि. १७/११/२०२३ रोजी सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजितकुमार उर्फ काकासाहेब मोटे हे असणार आहे.
सदर कार्यक्रम मुख्याध्यापक माने एस. व्ही., शिंदे एच. एस. (सर), मुलाणी वाय. डी. (सर), सर्जे एम. एम. (सर), कांबळे ए. एम. (सर), गोरड ई. जे. (सर), दडस के. एस. (सर), कुंभार डी. बी. (सर), दणाने एन. डी. (सर), मोटे टी. एस. (सर), महेश देवकाते (मंडळ अधिकारी), सौ. काझी एस. के. (मॅडम), डॉ. मच्छिंद्र गोरड सौ. जाधव के. एस. (मॅडम) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. दु. १२.३० वाजल्यापासून भोजन असणार आहे. तरी या स्नेह संमेलन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन २००३-२००४ च्या सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.