नेवरे येथे यल्लमा देवी यात्रा महोत्सवाचे आयोजन

नेवरे (बारामती झटका)
नेवरे ता. माळशिरस या गावाचे ग्रामदैवत यल्लमा देवी च्या यात्रा महोत्सवाचे आयोजन शनिवार दि. ९/१२/२०२३ ते बुधवार दि. १३/१२/२०२३ पर्यंत समस्त ग्रामस्थ नेवरे व कोंढार पट्टा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर यात्रेमध्ये शनिवार दि. ९/१२/२०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता कोंढारपट्टा ग्रामस्थांच्या वतीने ओटी, साडी पूजा होणार आहे. तसेच रविवार दि. १०/१२/२०२३ रोजी सकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत महापूजा व नैवेद्य होणार आहे. सायंकाळी छबिना निघणार आहे. तर रात्री ९ वाजता धुमधडाका ऑर्केस्ट्रा पुणे आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाटक ‘संसार माझा सुखाचा’ असे मनोरंजन पर कार्यक्रम होणार आहेत.

सोमवार दि. ११/१२/२०२३ रोजी दुपारी अग्नीहोम व सायंकाळी ९ वाजता कै. तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार दि. १२/१२/२०२३ रोजी सायंकाळी ९ वाजता कु. कमल वनिता कराडकर यांचा लोकनाट्य तमाशा चा कार्यक्रम होणार आहे.
तरी नेवरे व कोंढारपट्टा पंचक्रोशीतील भाविकभक्तांनी या भव्य यात्रा महोत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.