ताज्या बातम्याराजकारण

जनतेचे आमदार उत्तमराव जानकर सोलापूर लोकसभेचे खासदार होणार…

अकलूज (बारामती झटका)

माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी माळशिरस विधानसभा निवडणुकीत स्वर्गीय हनुमंतराव डोळस यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढलेले होते. त्यावेळेस अपक्ष असताना सुद्धा माळशिरस तालुक्यातून मताधिक्य घेतलेले होते. तेव्हापासून जनतेचे आमदार म्हणून तालुक्यामध्ये नेते व कार्यकर्ते या नावाने ओळखत होते. दुसऱ्यांदा आमदार राम सातपुते यांच्या विरोधात लढलेले होते त्याही वेळेला निसटता पराभव झालेला होता. त्यामुळे जनतेच्या व मतदारांच्या मनामध्ये असणारे जनतेचे आमदार उत्तमराव जानकर सोलापूर लोकसभेचे खासदार होणार अशी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. उत्तमराव जानकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटात आहेत. राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार सहभागी होऊन उपमुख्यमंत्री बनलेले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रवादीचा गट एकत्र निवडणूक लढणार आहेत.

सध्या भारतीय जनता पक्षाचे सोलापूर लोकसभेचे खासदार आहेत. मतदार संघाच्या रचनेमध्ये मोठ्या प्रमाणात धनगर समाज आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील व सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांना भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडून उत्तमराव जानकर यांना सोलापूर लोकसभा मतदार संघात मतदार संघाचा आढावा दौरा घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत. त्याप्रमाणे उत्तमराव जानकर आणि त्यांचे समर्थक सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा करीत आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळणार आहे. उत्तमराव जानकर यांच्या सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा सोलापूरच्या प्रस्थापित विरोधात मोळी बांधली जात आहे. मतदार संघात नेते व कार्यकर्त्यांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याने जनतेचे आमदार उत्तमराव जानकर सोलापूर लोकसभेचे खासदार होणारचचचचचच असे राजकीय विश्लेषकांकडून बोलले जात आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button