वाघोली येथील सौ. सुलन बाळकृष्ण माने शेंडगे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.
वाघोली (बारामती झटका)
वाघोली, ता. माळशिरस येथील सौ. सुलन बाळकृष्ण माने शेंडगे यांचे अल्पशा आजाराने दि. १० मार्च २०२४ रोजी पहाटे निधन झाले. श्री. बाळकृष्ण शंकर माने शेंडगे, प्रगतशील बागायतदार वाघोली यांच्या धर्म पत्नी होत्या. तसेच श्री. शिवाजी बाळकृष्ण माने शेंडगे, श्री. संतोष बाळकृष्ण माने-शेंडगे, गव्हरमेंट कॉन्ट्रॅक्टर, श्री. सतिष बाळकृष्ण माने शेंडगे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात पाच मुले, सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन (तिसऱ्याचा विधी) वाघोली, ता. माळशिरस येथे ठिकाणी दि. १२ मार्च २०२४ रोजी सकाळी ७.१५ वाजता होणार आहे.
स्वर्गीय सौ. सुलन माने शेंडगे यांचा सुसंस्कृत स्वभाव व धार्मिक वृत्तीच्या होत्या. नातेवाईक यांच्यामध्ये त्यांना आदराचे स्थान होते. माने शेंडगे परिवार यांच्यावर दुःखाची शोककळा पसरलेली आहे. मृतात्म्यास शांती लाभो व माने शेंडगे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो, हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे.