ताज्या बातम्या

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष उमेशकाका भाकरे यांचा सन्मान…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस विधानसभा अध्यक्ष पिसेवाडी गावचे युवा नेते नारायण बोराटे यांचा सन्मान संपन्न.

माळशिरस (बारामती झटका)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी पिसेवाडी गावचे युवा नेते उमेशकाका भाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजीकाका बागल यांनी पिसेवाडी गावचे युवा नेते नारायण बोराटे यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माळशिरस विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे. नूतन पदाधिकारी यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संपर्क कार्यालय येथे सन्मान संपन्न झाला.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मार्गदर्शक डॉ. सचिन शेंडगे, ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब काळे, अजित (भैय्या)बोरकर, मुकुंद काळे, अजय बोडरे, दादा काळे, राजेश खरात, राजकुमार काळे, अमोल मगर, वैभव गायकवाड, विलास काळे, आप्पा शिंदे, दादासाहेब वाघंबरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांना पुढील भावी कारकीर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button