पिलीव येथे महालक्ष्मी उत्सवानिमित्त भव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे आयोजन

पिलीव (बारामती झटका)
पिलीव ता. माळशिरस, येथे महालक्ष्मी उत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शर्यत महालक्ष्मी केसरी पिलीव ओपन बैलगाडा शर्यतीचे आयोजन अक्षय (भाऊ) वगरे, पै. अमोल (भैया) झुरूळे, गणेश (दादा) लेंगरे, सिद्धिविनायक गणेश मित्र मंडळ पिलीव, अमोल (भैया) मदने सरपंच फॅन्स क्लब यांच्यावतीने मंगळवार दि. १५/१०/२०२४ रोजी मौजे पिलीव, ता. माळशिरस, येथे करण्यात आले आहेत. सदरचे मैदान उत्तमराव जानकर (राष्ट्रवादी नेते शरदचंद्र पवार गट ), विनायक मासाळ (उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य), दादासो कचरे (युवा उद्योजक), महावीर शेंडगे, बाळासाहेब लेंगरे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे तसेच यावेळी नितीन शेवाळे (अध्यक्ष, अखिल भारतीय बैलगाडा संघटना), पै. विलास देशमुख (उपाध्यक्ष, अखिल भारतीय बैलगाडा संघटना), विजय काळे (अखिल भारतीय बैलगाडा संघटना सचिव मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य), माणिक वाघमोडे (तालुका अध्यक्ष, अखिल भारतीय बैलगाडा संघटना), आकाश सिद (तालुका कार्याध्यक्ष, अखिल भारतीय बैलगाडा संघटना) यांची देखील यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.
सदर यात्रेमध्ये प्रथम क्रमांकाचे १ लाख रुपयांचे बक्षीस युवा उद्योजक दादासो कचरे यांच्या वतीने देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकाचे ७१ हजार रुपयांचे बक्षीस गणेश लेंगरे आणि युवा उद्योजक पै. अमोल झुरुळे यांच्या वतीने देण्यात येणार आहे. तृतीय क्रमांकाचे ५१ हजार रुपयांचे बक्षीस श्रावणी संस्कार दूध संकलन केंद्र जावळेवस्ती, साई समर्थ दूध डेअरी कुसमोड, सुभाष उर्फ बंटी काळे (चेअरमन, वारणा दूध डेअरी), शिवपार्वती दूध संकलन केंद्र झिंजेवस्ती, नितीन लेंगरे कुसमोड यांच्या वतीने देण्यात येणार आहे. चतुर्थ क्रमांकाचे ३१ हजार रुपयांचे बक्षीस विकास कोकरे (हॉटेल जय मल्हार गार्डन साळमुख, हॉटेल शिवनेरी शाखा नं. २ पिलीव), पंचम क्रमांकाचे २१ हजार रुपयांचे बक्षीस स्व. नारायण पांडुरंग लेंगरे (मा. सरपंच कुसमोड), सहाव्या क्रमांकाचे ११ हजार रुपयांचे बक्षीस रविभाऊ मेटकरी (सरपंच, धावरी), सातव्या क्रमांकाचे ७ हजार रुपयांचे बक्षीस बापूसाहेब पिंजारी (कट्टर समर्थक परिचारक गट) यांच्यावतीने देण्यात येणार आहे.
सदरच्या मैदानाचे समालोचन महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे सरकार, विकास सर जगदाळे आणि लखन राज खांडेकर हे करणार आहेत. तसेच यावेळी झेंडा पंच म्हणून राजेंद्र बापू धनावडे हे असणार आहेत. या मैदानासाठी ढालीचे सौजन्य अजय खुर्द मातोश्री मेडिकल पिलीव यांच्या वतीने असणार आहे. तसेच या मैदानासाठी महावीर दादा शेंडगे मित्रपरिवार महाराष्ट्र राज्य, धुळोबा प्रसन्न, शंभू १०२० फॅन्स क्लब कुसमोड यांचे विशेष सहकार्य असणार आहे.

या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सागर बगाडे ८९७५२३४५५६, अक्षय भाऊ वगरे ८८८८०४२५०६, दीपक जावळे ८९७५४९१८२५, शिवा चव्हाण ९८९०६४९७३३, विकास देवकाते ८९९९९३७७०९, मंगेश वाघमारे ९४२१०७२५०४, निलेश मदने ८८८८९६०४५०, अजय खुर्द ८८०६१३६२६६, गणेश कपणे ९७६७२०२९९४, महेश धायगुडे ९३०७४८५५५०, महेश इंदलकर ७७२१८००६७७, उमेश चव्हाण ९३७३८७४००८, रवी सुळे ९५०४४०५३९४, नागेश कोळेकर ९६३७१९९०५९, अनंत वाघ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक अक्षय (भाऊ) वगरे, पै. अमोल (भैया) झुरूळे, गणेश (दादा) लेंगरे, सिद्धिविनायक गणेश मित्र मंडळ पिलीव, अमोल (भैया) मदने सरपंच फॅन्स क्लब यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.