हरियाणा विधानसभा भारतीय जनता पक्षाने बहुमताने जिंकल्यानंतर माळशिरस तालुक्यात भाजपचा जल्लोष; पेढे भरून आनंदोसव साजरा.
माळशिरस (बारामती झटका)
लोकसभेच्या दैदीप्यमान यशानंतर हरियाणा विधानसभेकडे देशाचे लक्ष लागून राहिलेले होते. भारतीय जनता पक्षाने बहुमताने विधानसभा जिंकल्यानंतर माळशिरस तालुक्यातील निष्ठावान भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करून आनंदोत्सवाने पेढे भरून आनंद साजरा केला.
भांबुर्डी गावचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय एकनाथआप्पा वाघमोडे यांच्या राजकीय विचारांचा वारसा जपणारे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे मार्गदर्शक वामनभाऊ वाघमोडे यांना भाजपचे व संघाचे एकनिष्ठ असणारे रेणुका हॉटेलचे मालक शिवाजीराजे सपकाळ यांनी विजयाचा आनंदोत्सव एकमेकांना पेढे भरून साजरा केला.
भांबुर्डी गावाची भारतीय जनता पक्षाशी नाळ जोडलेली आहे. कायम भाजपच्या विचाराने प्रेरित झालेले नेते व कार्यकर्ते कोणत्याही निवडणुकीत सक्रिय असतात.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
nagano tonic: nagano tonic