छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो गड किल्ले जिंकले पण त्यासाठी कधीही वेळ, मुहूर्त पाहिले नाही – सत्यशोधक ढोक

फुले एज्युकेशन तर्फे महात्मा दिनी १३ वा सत्यशोधक गृहप्रवेश सोहळा संपन्न झाला
पुणे (बारामती झटका)
फुले-शाहू-आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन चे बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे थोर समाजसुधारक व सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा जोतीराव फुले यांचे महात्मा दिनानिमित्त दि. ११ मे २०२५ रोजी दु. १२ वा. महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने पंतप्रधान आवास योजना १० मजला A1008 प्लॅट चा सत्यशोधक गृहप्रवेश सोहळा मोहननगर, आकुर्डी, पुणे येथे मोफत शानदारपणे पार पडला. या सोहळ्याचे विधीकर्ते म्हणून महात्मा फुले चरित्र, साधने, साहित्य व प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासनाचे सदस्य व संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी नेहमीप्रमाणे महात्मा फुले यांच्या वेशभुषेत समाजप्रबोधन करीत कार्य पार पडले.
यावेळी सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो गड किल्ले जिंकले पण त्यासाठी कधीही वेळ, मुहूर्त पाहिले नाही आणि त्यांनी होमहवन व पूजा घातली असे ऐकिवात नाही. पेशवाई लयास गेले नंतर भटजींनी आपले पोटापाण्यासाठी बहूजनाकडून आर्थिक लुबाडणूक कशी करता येईल म्हणून धार्मिक भीती घालून पूजा-पाठ, होमहवन सुरू केले. त्याला खीळ घालण्याचे काम महात्मा फुले यांनी केले. तसेच मुली व महिलांसाठी देशात प्रथम शाळा सुरू केल्या, त्याची फळे आज समाज चाखत आहे. ह्या पुण्याईची जाणीव आता लोकांना होऊ लागली असून विक्रम बनकर परिवार सारखे लोक हळूहळू पुढे येऊन फुले दांपत्याचा वारसा पुढे नेण्यासाठी अंधश्रद्धा, कर्मकांड याला तिलांजली देत घरापासून सत्यशोधक कार्य सुरू करू लागले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. व पुढे ढोक यांनी मुंबई, कोळीवाडा येथे जोतीराव फुले यांना महात्मा पदवी दिल्याची माहिती दिली.
राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सन्मान पत्र व संस्थेचे वतीने सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची फोटो प्रेम आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले गीत चरित्र सौ. अश्विनी आणि विक्रम बनकर यांना सत्यशोधक ढोक यांनी भेट दिले.
कार्यक्रमाचे सुरुवातीला श्रीमती गिरीजाबाई बनकर यांचे शुभहस्ते प्लॅटचे दरवाजाला भव्य हार तोरण बांधण्यात आले तर सौ. अश्विनी आणि विक्रम बनकर यांचे शुभहस्ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास हार घालण्यात आले आणि पाहुणे मंडळीचे हस्ते राष्ट्रीय ग्रंथ भारताचे संविधान, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले समग्र वाडमय ग्रंथाचे पूजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती गिरीजाबाई चंद्रकांत बनकर यांनी केले तर मोलाची मदत चि. संस्कार व उत्कर्ष विक्रम बनकर यांनी केली. तर आभार पोलिस हवालदार महेश नाळे व राजाराम ढोक यांनी मानले. यावेळी मोठ्या प्रमाणात नातेवाईक, आप्तेष्ट फलटण परिसरातून उपस्थित होती.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.