माळशिरस तालुक्यातील लाडकी लेक बनली दहिवडी नगरपंचायतीची नगराध्यक्षा, लेकीने माहेरसह सासरच नाव उंचावलं…

नातेपुते (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील दहिगाव गावची मोरे परिवारातील लाडकी लेक सौ. नीलम अतुल जाधव यांची दहिवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे. माळशिरस तालुक्यातील लेकीने माहेरसह सासरचे नाव उंचावलेले आहे.
दहिगाव, ता. माळशिरस येथील नागराबाई व भगवान मोरे सर्वसामान्य व शेतकरी कुटुंब आहे. त्यांना जगन्नाथ पोपट व रामचंद्र अशी तीन मुले व तीन मुली असा परिवार आहे. राजश्री व जगन्नाथ भगवान मोरे यांना शरदबापू जगन्नाथ मोरे, सुरेखा निलेश शिंदे, नीलम अतुल जाधव, रमेश जगन्नाथ मोरे, अशी दोन मुले व दोन मुली आहेत.
नीलम यांचा जन्म दि. 05/10/1981 साली झालेला आहे. त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण दहिगाव हायस्कूल दहिगाव येथे झालेले आहे. त्यांचा विवाह अतुल जाधव यांच्याशी 19/05/2005 साली झालेला आहे. माहेर मोरे घराणं व सासर जाधव घराणे दोन्हीही संस्कारिक घराणे आहेत.

ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे विश्वासू सहकारी अतुल जाधव यांनी माण पंचायत समितीच्या सभापती पदावर काम केलेले आहे. जयाभाऊ आणि अतुल दादा यांचे राजकीय विश्वासाचे अतूट नाते बनलेले आहे.
दहिवडी सारख्या मोठ्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध नीलम अतुल जाधव यांची नियुक्ती केलेली आहे. अतुल दादा आणि नीलम ताई यांच्या लग्नाचा वाढदिवस आणि नगराध्यक्ष पदाची जबाबदारी योगायोगाने एकत्र आल्याने ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे व सिद्धनाथ पतसंस्थेच्या ज्येष्ठ संचालिका सौ. सोनिया गोरे व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ सोहळ्याचे आयोजन केलेले आहे. सौ. नीलमताई अतुलदादा जाधव यांच्या भावी कारकीर्दीस बारामती झटका चे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांचेकडून खूप खूप शुभेच्छा. आपल्या हातून राष्ट्राची, देशाची, राज्याची व सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची सेवा घडो, हीच लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नांदा सौख्यभरे हार्दिक शुभेच्छा.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.