ताज्या बातम्यासामाजिक

झी टॉकीज फेम ह. भ. प. संगीताताई येनपुरे-चोपडे, मावळ यांचे गोरडवाडी येथे सुश्राव्य कीर्तन होणार

कै. नानासाहेब कर्णवर पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन

गोरडवाडी (बारामती झटका)

गोरडवाडी, ता. माळशिरस येथे कै. नानासाहेब आबाजी कर्णवर पाटील यांच्या चौथ्या पुण्यस्मरणाचे आयोजन रविवार दि. २५/५/२०२५ रोजी कर्णवर पाटील वस्ती, गोरडवाडी, ता. माळशिरस, येथे करण्यात आले आहे. या पुण्यस्मरणानिमित्त झी टॉकीज फेम ह. भ. प. संगीताताई येनपुरे-चोपडे मावळ, पुणे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कीर्तनानंतर आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

तसेच रविवार दि. २५/५/२०२५ रोजी सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर व गजीढोल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी नजरचुकीने आपणांस आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून पुण्यस्मरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन कर्णवर पाटील परिवार व समस्त ग्रामस्थ गोरडवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button