ताज्या बातम्यासामाजिक

महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीमध्ये अतिरिक्त पदभार चरण कोल्हे सोमवारी घेणार

श्रीपूर (बारामती झटका)

महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीचे अतिरिक्त मुख्याधिकारी म्हणून चरण कोल्हे हे सोमवारी पदभार घेणार आहेत. गेल्या आठवड्यात नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सतीश चव्हाण यांची वडूज येथे बदली झाली आहे. त्यानंतर मुख्याधिकारी पद रिक्त होते.

सध्या कोल्हे हे मंगळवेढा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून पुर्ण वेळ काम पहात आहेत. या पुर्वी दोन वेळा चरण कोल्हे यांनी अतिरिक्त मुख्याधिकारी म्हणून महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीचे कामकाज पाहिले आहे. सर्वांना समान न्याय व विकासाभिमुख अधिकारी म्हणून त्यांनी महाळुंग श्रीपूर नगरपंचायतीचे या पुर्वी काम केले आहे. अत्यंत शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. ते आल्यानंतर येथील नगरपंचायतीची रखडलेली कामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे. विकासकामांचे टेंडर प्रक्रिया सुरू होईल‌

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button