सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांची श्रीराम निवासस्थानी सदिच्छा भेट…

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी अतिथी देवो भव या नात्याने सन्मान केला..
मांडवे (बारामती झटका)
सोलापूर ग्रामीणचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या मांडवे, ता. माळशिरस येथील श्रीराम निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी ‘अतिथी देवो भव’ या नात्याने माजी आमदार राम सातपुते यांनी कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचा सन्मान केला.
आषाढीवारी निमित्त महाराष्ट्रातून पालख्या पंढरपूर येथे येत असतात. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्याचा मुक्काम, रिंगण व विसावा ठिकाणाची पाहणी दौरा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांचा दौरा होता. सदरच्या दौऱ्यामध्ये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्यासह प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर धर्मपुरी येथे पालखीच्या स्वागताच्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील दौऱ्याचा शेवट होऊन सातारा जिल्ह्यामध्ये मंत्री महोदय पुढील दौरा करण्याकरता गेल्यानंतर जिल्ह्यातील सर्व अधिकारी त्या ठिकाणाहून सोलापूरकडे रवाना झालेले होते. लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते व पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचे राजकारणापलीकडील मैत्रीचे नाते आहे. चहापानासाठी पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी आवर्जून माजी आमदार राम सातपुते यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिलेली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.