लोकप्रिय दमदार राम सातपुते यांनी विकासात्मक व कृतिशील वागण्यातून लोकप्रतिनिधी व जनता दरी कमी केली…

नातेपुते ( बारामती झटका )
श्री. मधुकर बापू पांढरे पाटील यांचे नातू व श्री. आजेश मधुकर पांढरे पाटील, रा. नातेपुते, ता. माळशिरस यांचे सुपुत्र चि. किशोर आणि कै. धोंडीबा भिवा येळे यांची नात व श्री. बाळासाहेब धोंडीबा येळे, रा. निमगाव (टें.), ता. माढा यांची सुकन्या चि. सौ. कां. शुभांगी यांचा शाही शुभविवाह सोहळा रविवार दि. ०८/०६/२०२५ रोजी दुपारी १२ वा. २५ मि. या शुभ मुहूर्तावर राजआनंद गार्डन मंगल कार्यालय, एमएसईबी बोर्ड समोर, दहिगाव रोड, नातेपुते, ता. माळशिरस येथे संपन्न झाला. विधान परिषदेचे माजी आमदार ज्येष्ठ नेते ॲड. रामहरी रुपनवर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शाही शुभ विवाह सोहळा संपन्न झालेला होता.

सदरच्या शाही शुभ विवाह सोहळ्यात भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी सदिच्छा भेट दिलेली होती. यावेळी श्री. अरविंद मधुकर पांढरे पाटील संचालक, सोलापूर जिल्हा सहकारी बोर्ड सोलापूर, व संचालक, धुळदेव ग्रा. बि. शे. पतसंस्था मर्या. नातेपुते, श्री. आजेश मधुकर पांढरे पाटील मा. चेअरमन, नातेपुते वि. का. स. सोसायटी नातेपुते,व संचालक, मामाश्री ग्रा. बि. शे. पतसंस्था नातेपुते, राजेंद्र धुळा काळे संचालक, धुळदेव ग्रामीण बिगर शेती पतसंस्था नातेपुते, भारतीय जनता पार्टी नातेपुते शहराध्यक्ष श्री. राजेंद्र दादासाहेब पांढरे पाटील, दादासो मार्तंड वाघमोडे उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी, श्री. रामचंद्र मधुकर पांढरे पाटील, प्रगतशील बागायतदार राहुल राजेंद्र काळे, अशोक राऊत, विशाल अरविंद पांढरे पाटील, जयराज अरविंद पांढरे पाटील, सुरज पांढरे पाटील, बाळासाहेब पांढरे पाटील, अभिजीत पांढरे पाटील, यांच्यासह पांढरे पाटील व येळे परिवारातील नातेवाईक उपस्थित होते.

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची विकासात्मक व कृतिशील वागण्यातून लोकप्रतिनिधी व जनता दरी कमी केलेली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये आमदार आहे, याची हवा डोक्यामध्ये न जाऊ देता सर्वसामान्य कार्यकर्त्यांसारखे राहिलेले होते. गोरगरिबांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत होते. त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये जिव्हाळ्याचे व मैत्रीचे नाते निर्माण केलेले होते. जय पराजयाची तमा न बाळगता आजसुद्धा सर्वसामान्य जनतेशी नाळ लोकप्रिय दमदार राम सातपुते यांनी जोडलेली आहे. आपण आमदार होतो, याचं राम सातपुते यांना काहीच वाटत नाही मात्र, जनतेला लोकप्रतिनिधी कसा असावा याचा प्रत्यय आलेला असल्याने आमदार राम सातपुते यांना कोणत्याही कार्यक्रमांमध्ये आमंत्रित केले जाते.
रविवारी लग्नाची मोठी तारीख होती अनेक ठिकाणी शुभ कार्याला भेटी दिलेल्या होत्या. त्याचप्रमाणे पांढरे पाटील व येळे यांच्या शुभविवाह सोहळ्यास सदिच्छा भेट देऊन वधू-वरांना शुभ अशीर्वाद दिले. पांढरे पाटील व येळे परिवार यांच्या वतीने लोकप्रिय दमदार राम सातपुते यांचा सन्मान करण्यात आला. भोजनाचा आग्रह केल्यानंतर मान राखत भोजनाचा आस्वाद सुद्धा घेतलेला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



