ताज्या बातम्याशैक्षणिकसामाजिक

जिल्हा परिषद शाळेचा पट वाढविण्याकरता सरपंच व उपसरपंच यांचा आदर्शवत स्तुत्य उपक्रम..


मांडवे (बारामती झटका)

मांडवे, ता. माळशिरस गावचे सरपंच रितेश बबनराव पालवे पाटील व उपसरपंच सुरज दिनकर साळुंखे पाटील यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पटसंख्या वाढविण्याकरीता आदर्शवत स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे.

मराठी मायबोली मातृभाषा आहे तर इंग्रजी मावशीच्या भूमिकेत आहे. दिवसेंदिवस माय मरो आणि मावशी जगो, अशी अवस्था शिक्षणाची झालेली आहे. अनेकजण आपली मुले मराठी माध्यम सोडून इंग्रजी माध्यमांकडे आकर्षित केलेली आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पटसंख्या दिवसेंदिवस घटत आहे. जिल्हा परिषद शाळेत मुलं असणं कमीपणा समजला जात आहे. खोट्या प्रतिष्ठेसाठी इंग्रजी माध्यमात विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी पाठवले जात आहे. मांडवे गावचे सुसंस्कृत व सुज्ञ सौजन्यशील असणारे सरपंच रितेश पालवे पाटील व उपसरपंच सुरज साळुंखे पाटील यांनी जिल्हा परिषद शाळेचा पट वाढविण्यासाठी अनोखा उपक्रम सुरू केलेला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सन २०२५/२०२६ या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या पाल्यांच्या आई-वडिलांची घरपट्टी व पाणीपट्टी सरपंच व उपसरपंच स्वखर्चातून पूर्ण करणार आहेत. यामुळे गावच्या ग्रामनिधीवर ताण येणार नाही. ग्रामनिधीवर अतिरिक्त बोजा नको म्हणून स्वखर्चाने घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याचा आदर्शवत उपक्रम हाती घेतलेला आहे.

मांडवे गाव माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात आहे. तालुक्यात सर्वात मोठे क्षेत्रफळ असणारे गाव आहे. या गावाला अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. मांडवे गाव सहा वार्डामध्ये विभागलेले आहे. 17 सदस्य असलेली मोठी ग्रामपंचायत आहे. सदरच्या ग्रामपंचायतीवर सरपंच रितेश पालवे पाटील व सुरज साळुंखे पाटील यांना बिनविरोध सरपंच व उपसरपंच पदावर काम करण्याची संधी मिळालेली आहे. सुशिक्षित व सुसंस्कृत लोकप्रतिनिधी असल्याने त्यांनी ग्रामीण भागातील मुलांचा शैक्षणिक पाया मजबूत व्हावा या दृष्टीने आदर्शवत निर्णय घेतला आहे.

मांडवे ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच यांचा आदर्श इतर ग्रामपंचायतींनी घ्यावा अशा पद्धतीने स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button