ताज्या बातम्याशैक्षणिकसामाजिक

माळशिरस पंचायत समितीचे प्रभारी माजी गटशिक्षणाधिकारी प्रदिपकुमार करडे यांचे दुःखद निधन…

नातेपुते (बारामती झटका)

माळशिरस पंचायत समितीचे प्रभारी माजी गटशिक्षणाधिकारी प्रदिपकुमार करडे यांचे आज शुक्रवार दि. 27 जून 2025 रोजी सकाळी पावणे सहा वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन बंधू, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

प्रदीपकुमार करडे यांनी कोल्हापूर, सोलापूर जिल्हा परिषद या ठिकाणी शिक्षण विस्तार अधिकारी, सांगोला व माळशिरस या ठिकाणी प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून यशस्वीपणे धुरा सांभाळली. गेल्या दोन वर्षापासून माळशिरस पंचायत समितीमध्ये प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून ते काम पाहत होते. एक शिक्षक प्रिय गटशिक्षणाधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. शिक्षक, पालक व प्रशासन त्यांचा समन्वय चांगल्या पद्धतीने ठेवलेला होता. शाळा व्यवस्थापन व शिक्षक यांच्याविषयी अनेक वेळा संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी फोन केलेला होता. सकारात्मक उत्तरे देऊन अडचणी सोडवत होते.

असा लोकाभिमुख अधिकारी काळाच्या पडद्याआड गेलेला असल्याने बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे. करडे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, हीच भावपूर्ण आदरांजली आहे.

नातेपुते येथील पर्वतेश्वर स्मशानभूमी येथे आजच सकाळी 10 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button