ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

सयाजीराजे वॉटरपार्क पाळणा अपघातात मृत्यू पावलेले तुषार धुमाळ यांच्या नातेवाईकांची जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे धाव…

अकलूज पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 445/2025 मध्ये वाढीव 105 कलम लावणे व सर्व आरोपींना अटक होत नसल्याने सहकुटुंबाचा आमरण उपोषण करण्याचा इशारा….

सोलापूर (बारामती झटका)

अकलूज, ता. माळशिरस येथील मोहिते पाटील यांच्या सयाजीराजे वॉटरपार्क मधील ऑक्टोपस राईड मधील पाळणा तुटून अपघातात मृत्यू पावलेले स्वर्गीय तुषार शशिकांत धुमाळ यांचे नातेवाईक श्री. विशाल रामचंद्र धुमाळ व अक्षय राजेंद्र धुमाळ यांनी अकलूज पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर नंबर 445/2025 मध्ये वाढीव कलम लावून सर्व आरोपींना अटक होत नसल्याने सहकुटुंब आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देणारे सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व सोलापूरचे पोलीस अधीक्षक श्री. शरद देशपांडे यांना निवेदन दिलेले आहे….

सदरच्या निवेदनात दि. 18/06/2025 रोजी माझे चुलत भाऊ तुषार शशिकांत धुमाळ हा त्याचे कामानिमित्त अकलूज येथे गेलेला होता. तेथे गेल्यावर त्याचे मित्र यांचे संभाषण झाल्यावर ते सर्वजण अकलूज येथील सयाजीराजे वॉटरपार्क या ठिकाणी फिरण्यासाठी गेलेले होते. तेथे गेल्यावर ऑक्टोपस राईट मध्ये माझा चुलत भाऊ बसलेला होता. त्याच्यासोबत त्याचा मित्र वैभव रुपनवर हाही होता. तिथे आमच्या गावातील धनाजी मल्हारी बंडगर रा. मदनवाडी, तसेच इतर त्याचे इन्शुरन्स कंपनीचे ही लोक फिरण्यासाठी गेलेले होते ते दुसऱ्या पाळण्यामध्ये बसलेले होते..

असे असताना सदर ऑक्टोपस राईटची देखभाल व दुरुस्ती वेळेमध्ये न करता त्यामध्ये बसून अपघात होण्याची दाट शक्यता असतानाही त्याबाबत कोणतीही योग्य ती कायदेशीर पूर्तता न करता सदर ऑक्टोपस राईड चालवली जात होती व त्यामध्ये अपघात होऊन एखाद्याच्या जीव जाऊ शकतो याची पूर्ण कल्पना असताना सदर ठिकाणच्या ऑपरेटर व्यवस्थापक व मुख्य व्यवस्थापक व मालक यांनी त्यांच्या कर्तव्यामध्ये कसूर करून सदर ठिकाणी अपघात घडून एखाद्या व्यक्तीच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो हे माहीत असतानाही त्याची व्यवस्थित देखभाल, दुरुस्ती केलेली नसल्यामुळे सदर ऑक्टोपस राईडचा एक पाळणा ज्यामध्ये माझा चुलत भाऊ व त्याचा मित्र बसलेला होता तो तुटून खाली जमिनीवर आदळला. त्यामध्ये बसलेला माझा चुलत भाऊ डोक्यावर व मानेवर पडून त्याला गंभीर इजा होऊन त्यामध्ये तो मृत्युमुखी पडलेला आहे. तसेच त्याच्यासोबत असलेला वैभव रुपनवर हा गंभीर जखमी झालेला आहे. असे निवेदन मयत तुषार शशिकांत धुमाळ यांच्या नातेवाईकांनी आठ दिवसाचा अल्टिमेटम देवून संपूर्ण कुटुंब उपोषण करणार असल्याचा इशारा दिलेला आहे…

सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मुंबई देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री साहेब तथा पालकमंत्री पुणे जिल्हा अजितदादा पवार, ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा जयकुमार गोरे, पर्यटन मंत्री साहेब महाराष्ट्र राज्य, उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब उपविभाग अकलूज ता. माळशिरस, तहसीलदार साहेब तहसील कार्यालय माळशिरस ता. माळशिरस, सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेब, अकलूज पोलीस स्टेशन अकलूज ता. माळशिरस यांना देण्यात आल्या आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button