मुख्यमंत्र्यांचा देवेंद्रजींचा आशीर्वाद, जयाभाऊंची साथ, रामभाऊंचा प्रयत्न तालुक्याला 31 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर…

सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री ना. जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांनी मा. आ. रामभाऊ सातपुते यांच्या मागणीने तालुक्याच्या विकासाला दिला भरघोस निधी…
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आशीर्वादाने व महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांच्या खंबीर साथीने भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार मा. आ. राम सातपुते उर्फ रामभाऊ यांच्या प्रयत्नातून तालुक्याला 31 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर झालेला आहे.
माळशिरसच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारसंघातील विविध कामांसाठी 31 रुपयाचा निधी जिल्हा नियोजन Dpdc मार्फत मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये जन सुविधा योजना 4.5 कोटी रुपये, नागरी सुविधा योजनेसाठी 50 लाख रुपये, नागरी सुविधा योजना 30 लाख रुपये, इतर जिल्हा रस्ते विकास योजनेसाठी 1 कोटी रुपये, ग्रामीण रस्ते विकास योजनेसाठी 4 कोटी रुपये, नवीन डीपी बसवण्यासाठी (एम एस सी बी) 6 कोटी रुपये, जिल्हा परिषदेच्या नवीन वर्ग खोली बांधकाम करण्यासाठी व दुरुस्तीसाठी 2.1 कोटी रुपये, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राची दुरुस्ती करण्यासाठी 70 लाख रुपये, पशुसंवर्धन बांधकामासाठी 20 लाख रुपये, नवीन अंगणवाडी बांधकामासाठी 50 लाख रुपये, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी दलित वस्ती 3 कोटी रुपये, व्यायाम शाळा व क्रीडांगण विकासासाठी 40 लाख रुपये, तालुक्यातील नगर परिषद व नगरपंचायतीच्या विविध विकासासाठी 5 कोटी रुपये, तालुक्यातील नवीन बंधारे बांधकाम व दुरुस्तीकरणासाठी 3.5 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे.

माळशिरस तालुक्यातील विकास कामांसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून तालुक्यातील जनतेने कोटीचे आकडे कधीच ऐकले नाही. देवाभाऊ, जयाभाऊ, रामभाऊ यांच्यामुळे तालुक्यातील विकासकामांना गती येणार असल्याने तालुक्यातील जनता एकच म्हणत आहे भारतीय जनता पार्टीचा विजय असो….
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



