Uncategorizedताज्या बातम्यासामाजिक

माळशिरस तालुक्यातील श्री क्षेत्र बाणलिंग मंदिर देवस्थानला “ब” वर्ग दर्जा प्राप्त झाला…

लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ, कणखर व कर्तव्यदक्ष पालकमंत्री जयाभाऊ, लोकप्रिय दमदार मा. आ. रामभाऊ, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुनीलभाऊ यांच्या प्रयत्नांना यश…

फोंडशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार मा. आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी नातेपुते मंडल ओबीसी अध्यक्ष सुनील गोरे यांच्या सततच्या पाठपुरायला यश आलेले आहे. महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचे सहसचिव का. गो. वळवी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ योजना “ब” वर्ग अंतर्गत माळशिरस तालुक्यातील श्री क्षेत्र बाणलिंग मंदिर देवस्थान फोंडशिरस या तीर्थक्षेत्र देवस्थानला पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे.

फोंडशिरस गावचे सरपंच पोपटराव बोराटे, ग्रामसेवक सदाशिव हनुमंत भंडलकर, बाळासाहेब गोरे महाराज यांच्या सहकार्याने भारतीय जनता पार्टी नातेपुते मंडल ओबीसी अध्यक्ष सुनील विष्णू गोरे यांनी श्री क्षेत्र बाणलिंग मंदिर देवस्थान “ब” वर्ग दर्जा प्राप्त करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. सुनील गोरे यांचा प्रयत्न सुरू होता. त्यावेळेला गावातील पुढारी नेते व कार्यकर्ते “ब” वर्ग दर्जा प्राप्त होणार नाही शक्यच नाही, असे बोलले जात होते.

लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ, कणखर व कर्तव्यदक्ष पालकमंत्री जयाभाऊ लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील भाऊ यांनी शक्य नसणारी गोष्ट शक्य करून दाखवलेली आहे.

श्री क्षेत्र बाणलिंग मंदिरास “ब” वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा झाल्यामुळे पाच कोटी रुपये निधी मिळणार आहे. त्यामधून वाहन तळाची व्यवस्था, वृक्ष लागवड व परिसर सुशोभीकरण, भक्त निवासाची निर्मिती, पर्यटन विकास व रोजगार निर्मिती, कचरा व सांडपाणी व्यवस्थापन, भाविकांसाठी पिण्याचे पाणी, पथदिव्याची सोय, स्वच्छता ग्रह व शौचालयाची उभारणी, संरक्षण भिंतीची उभारणी अशी भाविकांच्या उपयोगी कामे होणार असल्याने येणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासह महायुतीच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट व राज्यमंत्री या सर्वांचे श्री बाणलिंग देवस्थानचे सर्व भक्तगण व फोंडशिरस ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील भाविक भक्तांकडून या निर्णयाचे समाधान व आनंद व्यक्त केला जात आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom