जलसंपदा मंत्री ना. गिरीशजी महाजन यांचा माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे हेलिकॉप्टरने दौरा जाहीर…

सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री. शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख व कार्यकर्त्यांच्या भारतीय जनता पक्ष प्रवेश सोहळ्यास उपस्थिती.
नातेपुते (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीशजी महाजन यांचा मुंबई येथून हेलिकॉप्टरने माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे शनिवार दि. 27 डिसेंबर 2025 रोजीचा शासकीय दौरा श्री. सहाय्यक राजेश सोनवणे यांनी जाहीर केलेला आहे.

जलसंपदा मंत्री शासकीय निवासस्थान “सेवासदन” नारायण दाभोळकर मार्ग, मलबार हिल येथून मोटारीने मुंबई येथील महालक्ष्मी रेसकोर्स हेलिपॅड वर आगमन होऊन VT – JPA या हेलिकॉप्टरने नातेपुते, ता. माळशिरस जि. सोलापूर कडे प्रयाण करतील, नातेपुते येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मैदानावर आगमन होऊन मोटारीने एसएनडी इंटरनॅशनल स्कूल, नातेपुते कडे प्रयाण करतील.
सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री. शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख व कार्यकर्त्यांच्या भारतीय जनता पक्ष प्रवेश सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. पक्षप्रवेश सोहळ्यानंतर श्री. बाबाराजे देशमुख यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट देणार आहेत. निवासस्थानावरून हेलीपॅड कडे येऊन हेलिकॉप्टरने जळगाव कडे प्रयाण करणार आहेत. मंत्री महोदय समवेत स्वीय सहाय्यक श्रीकृष्ण काळे राहणार आहेत.

राज्यामध्ये नगर परिषद/ महानगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांनी दौऱ्याप्रसंगी योग्य ती दक्षता घ्यावी असा शासकीय दौरा स्वीय सहाय्यक राजेश सोनवणे यांनी जाहीर केले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



