दादा, तुम्ही कुठेही असाल तिथून लवकर घरी या आम्हाला तुमची फार आठवण येते… वडिलांना मुलगा आणि मुलीची भावनिक साद…

शैलेश महादेव टेळे रा. सिदाचीवाडी, माळशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर.. 22/08/2025 बेपत्ता आहेत.
माळशिरस (बारामती झटका)
शैलेश महादेव टेळे वय वर्ष 43 रा. सिदाचीवाडी माळशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर, रंग गोरा, मजबूत बांधा, चेहरा गोल, सर्वसाधारण डोळे, केस काळे, अंगात लाल टी-शर्ट व नाईट पॅन्ट, उंची 170 सेंटीमीटर दि. 22/08/2025 रोजी सकाळी 7.30 वाजता मुलांना क्लासला सोडण्यासाठी काळ्या रंगाची शाईन मोटरसायकल MH 45 AA 4743 माळशिरस येथून बेपत्ता असल्याचे बंधू रमेश महादेव टेळे यांनी पोलीस स्टेशन येथे हरवलेली व्यक्ती नोंद केलेली आहे.


शैलेश यांच्या पत्नी सौ. लताबाई, मुलगा कु. कृष्णा उर्फ पृथ्वीराज, मुलगी कु. प्रणिती यांच्यासह टेळे परिवारातील सदस्य, नातेवाईक व मित्रपरिवार सर्व परेशान व चिंतेमध्ये आहेत. शाळेमध्ये शिकत असणाऱ्या कृष्णा उर्फ पृथ्वीराज व प्रणिती यांना आपल्या वडिलांची म्हणजेच शैलेश दादांची आठवण येत आहे. लहान मुलांना आईसोबत वडिलांचीसुद्धा नितांत गरज असते. यामुळेच दादा तुम्ही कोठेही असाल तिथून लवकर घरी या. आम्हाला तुमची फार आठवण येत आहे, अशी वडिलांना मुलगा आणि मुलीगी भावनिक साद करीत आहेत.


पत्नी लताबाई यांच्या सुद्धा प्रपंचाच्या रथाचे एक चाक गडगडलेले असल्याने त्यांना सुद्धा अतिव दुःख होत आहे. त्यांची सुद्धा इच्छा आहे आपण परत या. पुन्हा सुखाने संसार करू, आपल्या मुला-मुलींचे भविष्य घडवू. तुम्हाला माझ्यासह परिवारातील कोणीही काहीही म्हणणार नाही. अशा टेळे परिवारातील सदस्यांसह पत्नी व मुला-मुलींची भावना झालेली आहे.

वरील वर्णनाचे शैलेश टेळे कोठे राहत असतील किंवा दिसले असतील तर त्यांनी 95 52 65 70 27, 99 2100 13 42, 96 23 74 49 91, 97 30 50 99 17, या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन टेळे परिवार यांच्याकडून करण्यात आलेले आहे..


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



