देवाभाऊ यांच्याकडून जयाभाऊ यांचे कौतुक, सोलापूर महानगरपालिकेवर भाजपाचा दणदणीत विजय!

लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सोलापूर महापालिकेच्या दैदीप्यमान विजयानंतर ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांचा केला सन्मान…
मुंबई (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उर्फ देवाभाऊंच्या सक्षम व दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वात सोलापुरात भारतीय जनता पार्टीने 87 जागांवर ऐतिहासिक विजय मिळवला आहे. हा विजय केवळ आकड्यांचा नसून, विकास, पारदर्शकता आणि लोकहिताच्या राजकारणावर जनतेने व्यक्त केलेला ठाम विश्वास आहे.
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाने केलेल्या कार्याला जनतेची स्पष्ट मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री महानगरपालिकेचे किंगमेकर जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांचा मुंबई येथे सन्मान केला.

निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! या ऐतिहासिक यशासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पक्षश्रेष्ठींचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मनापासून आभार मानले आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



