सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी श्री. कार्तिकेयन एस. यांचा अकलूजकरांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मान….

कार्तिकेयन एस. सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी; कुमार आशीर्वाद नागपूरचे जिल्हाधिकारी
सोलापूर (बारामती झटका)
सोलापूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी श्री. कार्तिकेयन एस. यांचा भारतीय जनता पार्टीचे अकलूजकरांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे अकलूज शहर अध्यक्ष महादेवरावजी कावळे, माळशिरस तालुका प्रभारी डॉ. निलेश ननवरे, अकलूज कार्यकारणी सदस्य कुणाल होनमाने, महावीर खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर जिल्हाधिकारी पदी बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर कोल्हापूरचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, असे पत्र सामान्य प्रशासन महाराष्ट्र राज्य सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी काढलेले आहे
कार्तिकेयन हे २०२० बॅचचे भाप्रसे आधिकारी आहेत. याआधी त्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट, नांदेड येथे सेवा बजावली आहे. कार्तिकेयन हे सनदी लेखापाल (Chartered accountant) आहेत. सध्याचे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांच्या धर्मपत्नी याशनी नागराजन सातारा जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



