माळशिरस येथे महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

माळशिरस (बारामती झटका)
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व प्रज्ञासूर्य विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ वी जयंती सालाबादप्रमाणे याही वर्षी उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरी होणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त जयंती महोत्सव २०२६ सिद्धांतनगर, माळशिरस यांच्या वतीने दि. १४ एप्रिल ते दि. १९ एप्रिल या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दि. १४/४/२०२६ रोजी सकाळी ८.०० वा. प्रभात फेरी, सकाळी १०.०० वा. नालंदा बुध्द विहार येथे झेंडावंदन व बुध्दपुजा, सकाळ सत्र – क्रांतीसुर्य महात्मा फुले व प्रज्ञासुर्य विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन, सायंकाळ सत्र – सायं. ८.०० वा. सुनहरी महफिल म्युझीकल ट्रॅक शो व विविध गुणदर्शन. बुधवार दि. १५/४/२०२६ रोजी दुपार सत्र – दुपारी १.०० वा. फनी गेम्स्, सायंकाळ सत्र – सायं. ८.०० वा. विविध गुणदर्शन कार्यक्रम व कबीर नाईकनवरे ऑर्केस्ट्रा, कोल्हापूर. गुरुवार दि. १६/४/२०२६ रोजी सायं. ८.०० वा. विविध गुणदर्शन कार्यक्रम व सोलो ग्रुप डान्स जादुगार द-ग्रेट गोगा यांचा जादुचा कार्यक्रम. शुक्रवार दि. १७/४/२०२६ रोजी सायं. ८.०० वा. महिलांसाठी होम मिनीस्टर सिनेअभिनेता क्रांती नाना मळेगांवकर प्रस्तुत न्यु होम मिनीस्टर खेळ पैठणीचा. शनिवार दि. १८/४/२०२६ रोजी सायं. ८.०० वा. विविध गुणदर्शन कार्यक्रम प्रख्यात कवी नितीन चंदनशिवे (दंगलकार) यांचे व्याख्यान व काव्य वाचन, रविवार दि. १९/४/२०२६ रोजी सायं. ५.३० वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबा फुले संयुक्त जयंती भव्य मिरवूणक काढण्यात येणार आहे.

तरी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सदाबहार कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, अशी विनंती विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



