देवाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली जयाभाऊ आणि राजाभाऊ जोडगोळी मोहिते पाटलांचा करेक्ट कार्यक्रम करणार….

सोलापूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघातून महाराष्ट्र विधान परिषदेसाठी निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू…
माळशिरस (बारामती झटका)
सोलापूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघातून महाराष्ट्र विधान परिषदेसाठी नॅशनल काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून श्री. वसंतराव दौलतराव देशमुख व भारतीय जनता पार्टीचे श्री. राजेंद्र विठ्ठल राऊत यांच्यामध्ये समोरासमोर लढत लागलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उर्फ देवाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ बार्शी विधानसभेचे माजी आमदार तथा उमेदवार श्री. राजेंद्र विठ्ठल राऊत उर्फ राजाभाऊ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मोहिते पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम करणार अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे..
महाराष्ट्र विधान परिषद सोलापूर ठाणे प्राधिकारी मतदार संघामध्ये करमाळा नगरपरिषद 23, कुर्डूवाडी नगर परिषद 23, माढा नगरपंचायत 19, बार्शी नगरपरिषद 47, वैराग नगरपंचायत 19, अक्कलकोट नगर परिषद 29, मैंदर्गी नगर परिषद 23, दुधनी नगर परिषद 23, पंढरपूर नगरपरिषद 41, मोहोळ नगरपरिषद 23, अनगर नगरपंचायत 20, मंगळवेढा नगरपरिषद 23, सांगोला नगरपरिषद 26, अकलूज नगर परिषद 30, माळशिरस नगरपंचायत 19, नातेपुते नगरपंचायत 19, महाळुंग श्रीपुर नगरपंचायत 19, महानगरपालिका 111, जिल्हा परिषद 79 असे 616 मतदार आहेत. त्यापैकी 305 पुरुष व 311 महिला मतदार आहेत..
महाराष्ट्रामध्ये भाजप, राष्ट्रवादी अजितदादा पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट, महायुतीच्या माध्यमातून विधान परिषद निवडणुका लढत आहेत. त्यामध्ये सहा ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बिनविरोध निवडणूक होईल, अशी शक्यता विरोधी गटातील आमदार यांच्याकडून सुद्धा वर्तवली जात होती. मात्र, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या आडमुठ्या व हेकीखोरीमुळे निवडणूक लागलेली आहे.

राष्ट्रवादीकडून उमेदवार तोलामोलाचा नसल्याचे लोकप्रतिनिधींकडून समाज माध्यमांवर बोलले जात आहे. त्यामुळे महायुतीच्या विरोधी असणाऱ्या लोकप्रतिनिधी व मतदारांची भावना वेगळी झालेली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक मोहिते पाटील विरोधी अशा वळणावर येऊन ठेपलेली आहे. मतदारांच्या भेटीगाठीसाठी जयाभाऊ आणि राजाभाऊ मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. महायुतीतील मतदारांचा पाठिंबा तर आहेच मात्र, विरोधी गटातील मतदारसुद्धा वेगळी चर्चा करताना पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे देवाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली जयाभाऊ आणि रामभाऊ ही जोडगोळी मोहिते पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम करणार, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे..
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



