ताज्या बातम्यासामाजिक

चि. विराज जाधव, मळोली आणि चि. सौ. कां. ऐश्वर्या काटे देशमुख माळेगाव खुर्द यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार….

प्रेषक
श्री. मनोजकुमार फत्तेसिंह जाधव.
संचालक, मळोली विकास सेवा सोसायटी.
श्री. रणजीतसिंह जयसिंगराव जाधव.
मा. सदस्य पंचायत समिती माळशिरस.

मळोली (बारामती झटका)

स्वर्गीय फत्तेसिंह नारायणराव जाधव यांचे नातू व सौ. नीलम व श्री. मनोजकुमार फत्तेसिंह जाधव, रा. मळोली, ता. माळशिरस यांचे ज्येष्ठ सुपुत्र चि. विजयीभव विराज आणि स्वर्गीय रामचंद्र विश्वासराव काटे देशमुख यांची नात व सौ. पल्लवी व श्री. बाळासो रामचंद्र काटे देशमुख रा. माळेगाव खुर्द, ता. बारामती, यांची सुकन्या चि. सौ. कां. ऐश्वर्या यांचा शाही शुभविवाह सोहळा बुधवार दि. 08/07/2026 रोजी दुपारी 12 वाजून 40 मिनिटे या शुभमुहूर्तावर शिवतीर्थ मंगल कार्यालय शिवनगर, माळेगाव कारखाना माळेगाव बु., ता. बारामती, जि. पुणे येथे संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे, असे प्रेषक मळोली विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक श्री. मनोजकुमार फत्तेसिंह जाधव, माळशिरस पंचायत समितीचे मा. सदस्य श्री. रणजीतसिंह जयसिंगराव जाधव व समस्त जाधव परिवार मळोली यांच्या वतीने शुभविवाह कार्यास उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

सप्तपदीच्या पवित्र बंधनाने एकमेकांस आजन्म साथ देणाऱ्या नवदांपत्यास शुभ आशीर्वाद देण्यास आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे असे आपले नम्र श्रीमती विजयमाला फत्तेसिंह जाधव, सौ. नीलम मनोजकुमार जाधव व श्री. मनोजकुमार फत्तेसिंह जाधव संचालक, मळोली विकास सेवा सोसायटी, सौ. अर्चना रणजीतसिंह जाधव सरपंच, ग्रामपंचायत मळोली व श्री. रणजीतसिंह जयसिंगराव जाधव मा. सदस्य पंचायत समिती माळशिरस, सौ. राजनंदिनी सत्यजित जाधव व श्री. सत्यजित जयसिंगराव जाधव चेअरमन, मळोली विविध कार्यकारी सेवा सोसायटी, श्रीमती स्मिता अरुणसिंह जाधव, चि. राजदीप अरुणसिंह जाधव, चि. शिवतेज मनोजकुमार जाधव, चि. धनराज अरुणसिंह जाधव, चि. जन्मेजय रणजीतसिंह जाधव, चि. इंद्रजीत रणजीतसिंह जाधव, चि. यशराज सत्यजित जाधव, कु. अनुप्रिया सत्यजित जाधव, आणि समस्त जाधव परिवार मळोली यांच्या वतीने शुभ विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सदर शाही शुभविवाह सोहळ्याचे श्री. केशवराव दादासो जाधव, श्री. मनोजकुमार भगवानराव जाधव व्हाईस चेअरमन, विविध कार्यकारी सेवा सोसायटी मळोली, श्री. पृथ्वीराज संभाजी जाधव, श्री. कविराज संभाजी जाधव, श्री. उदय शिवाजी जाधव, श्री. मदन मुरलीधर जाधव, श्री. मिलिंद मुरलीधर जाधव, श्री. अभिनव मोहनराव जाधव, चि. शुभम हरिश्चंद्र जाधव, स्वागतोत्सुक करणार आहेत.

लग्नाच्या घाईगडबडीत आपणांस हस्ते परहस्ते आमंत्रण अथवा निमंत्रण न मिळाल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे समस्त जाधव परिवार व एन. आर. जाधव आणि कंपनी इंडियन ऑइल डिलर वेळापूर, ता. माळशिरस या फर्मच्या वतीने मित्रपरिवार व नातेवाईक यांना शाही शुभ विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button