मोहिते पाटील गटाचा बडा नेता राम सातपुते यांच्या संपर्कात! माळशिरस तालुक्यातील राजकीय बुरुज ढासळणार ?

आरोग्यदूत राम सातपुते यांच्या रणनीतीने भाजपची ताकद वाढली; कमळ घराघरात फुलविण्याची मोहीम सुरू
माळशिरस (बारामती झटका)
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय माजी आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यात भाजपची ताकद वाढविण्यासाठी जोरदार मोहीम सुरू केली आहे. त्यांच्या राजकीय रणनीतीमुळे मोहिते पाटील गटासह पारंपारिक विरोधी गटाला मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे.
मोहिते पाटील गटाला धक्का
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहिते पाटील गटाचा एक बडा राजकीय नेता सध्या रामभाऊ सातपुते यांच्या संपर्कात आहे. लवकरच त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मोहिते पाटील यांचा माळशिरस तालुक्यातील राजकीय बुरुज ढासळण्याची चिन्हे आहेत.


जनसेवेच्या जोरावर जनाधार
विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील आणि जानकर गट एकत्र असतानाही राम सातपुते यांना जनतेने 1 लाख 8 हजार मतदान देऊन समर्थन दिले होते. आमदार असो वा नसो, श्रीराम निवास येथील जनता दरबारातून ते आजही गोरगरीबांची सेवा करत आहेत. त्यामुळेच मोहिते पाटील आणि जानकर गटाचे अनेक कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात आहेत.
नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली संघटन वाढ
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे आणि माढा लोकसभेचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या साथीने माळशिरस तालुक्यात भाजपचे जाळे मजबूत होत आहे.

राम सातपुते यांची तालुका समितीमध्ये सह-अध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी त्यांच्याकडे विशेष लक्ष आहे. त्यांनी यापूर्वी भाजयुमोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. त्यामुळे राष्ट्रीय संघटन महामंत्री श्री. शिवप्रकाशजी, प्रदेश कार्यालयीन प्रमुख रवीजी अनासपुरे, प्रदेश सरचिटणीस राजेशजी पांडे यांच्यासह वरिष्ठ नेते त्यांना भेटून मार्गदर्शन करत आहेत.
कमळ घराघरात फुलणार
सदस्यता अभियानाच्या माध्यमातून राम सातपुते यांनी वाड्या-वस्त्यांवर घराघरात भाजपचे कार्यकर्ते तयार केले आहेत. अलीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळापूर येथे रस्त्यावर आ.उत्तमराव जानकर यांचा सन्मान स्वीकारल्याने सोशल मीडियावर चर्चा झाली. मात्र भाजप कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास आहे की, मुख्यमंत्री आणि राम सातपुते यांचे राजकीय नाते अतूट आहे.



“कुणी सत्कार केला म्हणून भाजपच्या नेत्यांची किंमत कमी होत नाही” असा विश्वास व्यक्त करत येणाऱ्या काळात राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस तालुक्यात भाजपचे कमळ घराघरात फुलणार असल्याचे निष्ठावान कार्यकर्ते सांगत आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



