युवा कीर्तनकार ह. भ. प. रमेश महाराज लांडगे यांचे भांबुर्डी येथे सुश्राव्य कीर्तन होणार

कै. आण्णा वाघमोडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन
भांबुर्डी (बारामती झटका)
कै. आण्णा संभा वाघमोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे आयोजन सोमवार दि. ३/८/२०२६ रोजी खोरेवस्ती (खंडोबावस्ती), भांबुर्डी, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. या पुण्यस्मरण निमित्त युवा कीर्तनकार ह. भ. प. रमेश महाराज लांडगे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कीर्तनानंतर आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या पुण्यस्मरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन सौ. वैशाली व श्री. विष्णू आण्णा वाघमोडे, सौ. पूजा व श्री. प्रवीण आण्णा वाघमोडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
तरी नजरचुकीने आपणांस आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त वाघमोडे परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



