ताज्या बातम्यासामाजिक

रुक्मिणी लॉन्स मंगल कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार, सरगर परिवार यांची नव्या उद्योग व्यवसायाला सुरुवात…

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते मा. आ. रामहरी रूपनवर प्रमुख पाहुणे तर अनेक आमदार व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत संपन्न होणार…

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते व विधान परिषदेचे माजी आमदार रामहरी रुपनवर प्रमुख पाहुणे तर माळशिरस विधानसभेचे आमदार उत्तमराव जानकर, जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर, सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब देशमुख, माळशिरस विधानसभेचे मा. आमदार रामभाऊ सातपुते, सोलापूर जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील, म्हसवड च्या नगराध्यक्षा सौ. पूजा सचिन विरकर, सोलापूर जिल्हा परिषद सदस्य गौतम (आबा) माने, कण्हेर गावचे माजी सरपंच भरत शंकर माने यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दि. 21/09/2026 रोजी सकाळी 10.00 वाजता रुक्मिणी लॉन्स मंगल कार्यालय, म्हसवड -माळशिरस रोड, मासाळवाडी, म्हसवड, ता. माण, जि. सातारा, येथे संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे, असे सौ. रतनबाई व श्री. महादेव दाजी सरगर, सौ. रुक्मिणी व श्री. शिवदास (आबा) दाजी सरगर आणि समस्त सरगर परिवार कण्हेर यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे…

सरगर परिवार यांनी प्रतिकूल परिस्थितीत शेती, मेंढपाळ, आचारी, आबा सरगर मंडप या व्यवसायातून समाजामध्ये स्वकर्तृत्व व कार्यातून आपली प्रतिष्ठा निर्माण केलेली आहे. तीस वर्ष आचारी व्यवसाय करीत 40 वर्ष मंडप व्यवसाय सुरू आहे. सरगर परिवार नव्याने व्यवसायाला सुरुवात करीत आहे.

रुक्मिणी लॉन्स मंगल कार्यालय उद्घाटनास बारामती झटका परिवार यांचे कडून लाख लाख शुभेच्छा….

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button