ताज्या बातम्यासामाजिक

सोलापूर जिल्हा परिषद मध्ये अधिकाऱ्याची शिपायाने केली पैशाची पोलखोल…

जिल्हा परिषद मध्ये ऐकावे तेवढे नवलच, सध्या चालू असलेल्या घडामोडींवर लोकप्रतिनिधी दखल घेणार की नाही असा प्रश्न ?

सोलापूर (बारामती झटका)

सोलापूर जिल्हा परिषदेमधील एका विभागाचा प्रमुख अधिकारी यांना वरकमाईतून मिळालेल्या पैशाकडे पाहून त्यांचे हात थरथर कापायला लागले, त्यांचे बळ कमी होऊ लागले, सर्व पैसे पाहून वरकमाईतून मिळालेली पैशाने भरलेली बॅग घरी कशी घेऊन जायची याबाबत खूप टेन्शन आले होते, सदरची बॅग त्यांच्या शिपायाने पाहिली व आपल्या साहेबाची अवस्था पाहून साहेबांच्या पैशाची बॅग स्वतः उचलुन गाडीत घालून स्वतः गाडी चालवीत आहे. साहेबांना घरी सुखरूप पोहोच केले परंतु साहेबांनी त्या शिपायाला काहीच पैसे दिले नसल्याने शिपायाने संबंधित घटनेची माहिती सांगून लोकांना साहेबांचा पराक्रम सांगायला सुरुवात केली. सदरच्या घटनेची इतंभूत माहिती बारामती झटका चमूच्या हाती लागलेली आहे.

सदर घटना वाऱ्यासारखी पसरली आहे, आता त्या साहेबांचे परत बळ कमी झाले, अशी चर्चा चालु आहे.

जिल्हा परिषदेमध्ये ऐकावे तेवढे नवलच. सध्या चालू असलेल्या घडामोडींवर लोकप्रतिनिधी दखल घेणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. क्रमश:

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button