यशवंतनगर येथील सौ. पुजा कुंभार यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन…

यशवंतनगर (बारामती झटका)
यशवंत नगर, महर्षी नगर येथील सौ. पुजा (महानंदा) रमण कुंभार वय ५० यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार दि. २३/१०/२०२६ रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अकलूज विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी संचालक भारत कुंभार यांच्या त्या भावजई होत. अकलूज येथील लिंगायत स्मशानभुमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सौ. पुजा ऊर्फ महानंदा रमण कुंभार यांचा स्वभाव मनमिळावू होता. त्या नेहमी सर्वांशी प्रेमाने आणि आपुलकीने वागत असत. त्यांच्या स्वभावामुळे त्या अनेक लोकांशी जोडल्या गेल्या होत्या.
सौ. पुजा (महानंदा) रमण कुंभार यांच्या निधनाने कुंभार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परमेश्वर कुंभार परिवाराला या दु:खातून सावरण्याचे बळ देवो आणि सौ. पूजा कुंभार यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच बारामती झटका परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



