माळशिरसच्या नगरसेविका ॲड. रेश्माताई टेळे यांना राज्यस्तरीय आदर्श लोकप्रतिनिधी महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान.

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस नगर पंचायतीच्या नगरसेविका ॲड. रेश्माताई टेळे यांना राज्यस्तरीय आदर्श लोकप्रतिनिधी महाराष्ट्र गौरव पुरस्कार नुकताच पुणे येथे एमआयटी ग्रुप पुणे चे संचालक महेश थोरवे यांच्या हस्ते देण्यात आला. मेडल, ट्रॉफी, पंचा, मानाचा फेटा आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमास राष्ट्रभक्ती महिला संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष सौ. भारती तुपे, ग्रेट पीपल सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रियंका अबनावे, राष्ट्रभक्ती परिवाराचे अध्यक्ष सुनील गोरे आदी मान्यवर व पुरस्कारकरते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रेश्माताई टेळे या सर्वसामान्य कुटुंबातील असून प्रथमच त्यांनी माळशिरस नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये विजय संपादन केला होता. तेव्हापासून समाजसेवेचा वसा आणि वारसा घेऊन त्या समाजासाठी सातत्याने झटत राहिल्या. शोषित आणि वंचित घटकांना घेऊन विकासाची गंगा दारापर्यंत नेली. प्रभाग क्रमांक 11 मध्ये त्यांनी विकासाचे मॉडेल काय असते, ते दाखवून दिले. त्याचबरोबर नगरसेवक आपल्या दारी ही संकल्पना आणली. त्याने प्रभाग क्रमांक 11 मध्ये रस्ते असतील, गटारी असतील, नळ कनेक्शन असतील, दिवाबत्ती असेल, स्वच्छता असे अनेक सामाजिक कामे केली. गतवर्षी माळशिरस शहरातील पाणीटंचाई लक्षात घेऊन पूर्वीपासून गावाला पाणीपुरवठा करणारी जुनी विहीर त्यातील स्वखर्चाने गाळ काढून गावासाठी पाणी उपलब्ध करून दिले.

अशा अनेक उल्लेखनीय कामाची दखल घेऊन राष्ट्रभक्ती परिवाराच्या वतीने हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



