राजे गटाने जिल्हा बँकेला झालेला विजय हा आपला पराभव आहे हे मान्य करावे – नगरसेवक अशोकराव जाधव.

सातारा (बारामती झटका)
सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी खासदार श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे फक्त 29 मते होती. त्यामध्ये वाढ होऊन ती संख्या 60 वर गेली. याचा अर्थ मते कोणाची फुटली एवढे कळण्याइतकी फलटण तालुक्यातील जनता सुज्ञ आहे.
राजे गटाला झालेला विजय जिव्हारी लागला असून ते आपला पराभव आकड्यांचे गणित मांडून लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे, त्याची कीव येते.
मागील झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत श्रीमंत रामराजे विरुद्ध खासदार गटाचे श्री. तुकाराम शिंदे यांची लढत झाली होती. त्यावेळी श्री. तुकाराम शिंदे याना फक्त 9 मते पडलेली होती. बाकी सर्व सोसायट्या राजे गटाच्याच ताब्यात होत्या. आज खासदार गटाचे श्री. समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना 60 मते मिळालेली आहेत. मग मते कोणाची फुटली याचे आत्मपरीक्षण राजे गटाने करण्याची गरज आहे.
या पुढील तालुक्यातील ग्रामपंचायती व सोसायटीच्या निवडणुका खासदार गट एक दिलाने लढणार आहे. फलटण तालुका माजी खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मागे खंबीरपणे उभा आहे, हेच या जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून सिद्ध झाले आहे. असे परखड मत नगरसेवक अशोकराव जाधव यांनी निवडणुकीच्या विश्लेषणावर व्यक्त केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



