संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन
सोलापूर (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा सरहद्दी वरती धर्मपुरी ग्रामस्थांच्या वतीने संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे स्वागत मोठ्या उत्साहात फटाक्यांच्या आतिशबाजीत तसेच पुष्पृष्टीचा वर्षाव करून दिमाखात करण्यात आले.

यावेळी भाजपाचे माळशिरस तालुका अध्यक्ष श्री. बाजीराव काटकर, धर्मपुरीचे माजी सरपंच विष्णू केंजळे, उत्तम निगडे, ग्रामपंचायत सदस्य सागर झेंडे, दादा पाटोळे, बबन झेंडे, सुरेश कर्चे, निलेश काटकर, राहुल रणदिवे, विकास जाधव, तुकाराम झेंडे, अभिजीत पाटोळे, गणेश ढोबळे, नवनाथ पाटोळे, गणेश भोकरे, दीपक ढोबळे, गणेश निगडे, निलेश निगडे, ओमकार काटकर, दीपक मसुगडे, रणजीत काटकर आदी उपस्थित होते.



संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे स्वागत करतेवेळी अनेक ग्रामस्थ, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय भावपूर्ण वातावरणात पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng