महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा उंचावल्या…
माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निर्णयाला चपराक बसवून महसूल मंत्री पदाची राधाकृष्ण विखे पाटील यांनी उंची वाढवावी, सर्वसामान्य जनतेची अपेक्षा
अहमदनगर ( बारामती झटका )
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते देवेंद्रजी फडवणीस यांनी सरकार स्थापन केलेले आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला आहे. 18 मंत्र्यांना शपथ देऊन त्यांना खाते वाटप केलेले आहे. त्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल, दुग्धविकास व पशुसंवर्धन या खात्याची जबाबदारी आलेली असल्याने महसूल विभागातील सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सुटणार असल्याने विखे पाटील यांच्याकडून सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत.
महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस अशा पक्षांचे सरकार गेली अडीच वर्षे अस्तित्वात होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सरकारमध्ये महसूल मंत्री पदाची जबाबदारी बाळासाहेब विखे पाटील यांच्याकडे होती. या कालावधीत गुंठेवारी खरेदी बंद करण्यात आलेली होती. त्यामुळे शासनाचा दररोज पंधरा कोटीच्या आसपास महसूल बुडत होता आणि सर्वसामान्य नागरिकांची गुंठेवारी खरेदी विक्री बंद झालेली असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कितीतरी लोकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी आपल्या दैनंदिन गरजा भागवून मुलामुलींच्या उज्वल भविष्यासाठी, यशासाठी काही जमीन व प्लॉट खरेदी केलेली आहेत. सध्या गुंठेवारी खरेदी-विक्री बंद असल्यामुळे अनेकांना अडचणी उद्भवलेल्या आहेत.
विशेष म्हणजे शासनाला दारूनंतर जास्तीत जास्त महसूल खरेदी विक्री व्यवहारामधून होत असतो. दैनंदिन 15 कोटी रुपयांचा महसूल महाविकास आघाडी सरकारच्या काळात बुडालेला होता. एकनाथ शिंदे व देवेंद्रजी फडवणीस यांच्या सरकारमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी क्रांतिकारक निर्णय घेऊन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निर्णयाला चपराक बसून महसूल मंत्री पदाची उंची वाढवावी, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे.
बारामती झटका परिवाराचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांचेकडून महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा…
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great job on this piece! Its both informative and engaging. Im eager to hear your thoughts. Click on my nickname for more interesting reads!