निमगावमध्ये महायुतीच बळकटी करण्याचा निश्चय झाला.

माढा लोकसभा मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीची रणनीती ठरली..
माढा (बारामती झटका)
सोलापूर दुध संघाचे चेअरमन माढा तालुक्याचे युवा नेते भावी आमदार रणजीतभैय्या शिंदे यांच्या आग्रहाच्या विनंतीवरून माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व मान खटाव तालुक्याचे भाग्यविधाते आमदार जयकुमार गोरे व करमाळा विधानसभेचे लाडके नेतृत्व आमदार संजयमामा शिंदे यांना जेवणाचे निमंत्रण दिले होते. निमगाव येथे बैठक संपन्न झाली. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघातील अनेक राजकीय व विकासात्मक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.

मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न एकत्रितपणे मार्गी लावू. या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुती भक्कम करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले. तसेच लवकरच महायुतीचा मेळावा घेण्यात येईल. महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आमदार जयकुमार गोरे व आमदार संजयमामा शिंदे हे लवकरच सर्व महायुतीच्या घटक पक्षाबरोबर चर्चा करणार आहेत. आम्ही करमाळा व माढा मतदारसंघातून जास्तीत जास्त मतदान लोकसभेला महायुतीचा पाठीशी उभे करू, असे यावेळी बोलताना रणजीतभैय्या शिंदे यांनी सांगितले.
यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी सांगितले की, निवडणुकीत महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील १० लोकसभा मतदारसंघापैकी माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार विक्रमी मताने उमेदवार निवडणूक आणणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.