क्रीडाताज्या बातम्या
विजयकृष्ण थोरात याची धनुर्विद्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस येथील विजयकृष्ण नवनाथ थोरात यांची ९वर्षाखालील गट धनुर्विद्या स्पर्धा हिंगोली येथे दि. ३०/०१/२०२४ रोजी झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवून ब्रांझ मेडल पटकावले आहे. त्याने सातारा येथे जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक (सुवर्णपदक) पटकावले होते.
विजयकृष्ण थोरात याची विजयवाडा आंध्र प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल नगरसेविका रेश्मा ताई टेळे यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष सुरेशभाऊ टेळे, वडील नवनाथ थोरात आई स्वाती थोरात उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.