ताज्या बातम्या

वैराग, बार्शी येथील चंद्रकांत गोंदकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

बार्शी (बारामती झटका)

वैराग येथील निवासी श्री. चंद्रकांत गणपत गोंदकर यांचे आज बार्शी येथे दुःखद निधन झाले‌. ते ७१ वर्षाचे होते.

त्यांची वैराग येथे नावाजलेले टेलर म्हणून ओळख होती. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार चालू होते. ते काळेगावच्या ग्रामपंचायत अधिकारी श्रीम. रेखा गोंदकर यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात मुलगा जीवन, मुली रेखा व ज्योती, जावई श्री. कुंडलिक खुर्द, नातवंडे असा परिवार आहे.

गोंदकर परिवारास यांना दुःखातून सावरण्याचे परमेश्वर बळ देवो आणि कै. चंद्रकांत गोंदकर यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच बारामती झटका परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

6 Comments

  1. With a focus on precision and reliability, BWER offers state-of-the-art weighbridge systems to Iraq’s industries, meeting international standards and supporting operational efficiency.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button