माळशिरस येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी सर्व समाज बांधवांकडून महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी ॲड. नितीन पिसे, गंगाधर पिसे, शिवाजी शिंदे, डॉ. सचिन केमकर, डॉ. संजय गायकवाड, भगवान शिंदे सर, ॲड. गोरवे, ॲड. भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमावेळी धनंजय मस्के, नगरसेवक प्रवीण केमकर, जयराम मस्के, शुभम परमाळे, अशोक राऊत, बाजीराव पिसे, मोहन पिसे, मनोज गायकवाड, सचिन मस्के, बापू जमदाडे, रघुनाथ बोराटे, नारायण पिसे, प्रकाश मस्के, हर्षद शिंदे, पांडू शिंदे, अंकुश पिसे, मारुती बोराटे, जयवंत पिसे, संजय मस्के, धनंजय पिसे, सचिन बोराटे, समीर म्हस्के, नागनाथ बोराटे, नागनाथ पिसे, नितीन मस्के, पप्पू शिंदे, प्रदीप होळकर, महेश कापरे, प्रवीण राऊत, देविदास बोराटे, गोपाळ पिसे, संजय जमदाडे, नेवसे, शिवाजी शिंदे, दत्तू जंगले, सुभाष पिसे, महेश बोराटे, निलेश पिसे, युवराज जमदाडे, रासकर, शिरीष जमदाडे, संग्राम पिसे आदी मान्यवरांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ मस्के यांनी केले. तर आभार दादा बोराटे यांनी मानले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.