ताज्या बातम्याराजकारणविशेष

देशमुखवाडी ग्रामपंचायतीचे थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच व सर्व सदस्य बिनविरोध.

थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच प्रतिभा अविनाश देशमुख व ग्रामपंचायतीचे नऊ सदस्य यांची बिनविरोध निवड झाली.

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील देशमुखवाडी गावच्या सर्व नेते, कार्यकर्ते, मतदार बंधूभगिनी यांनी समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे. थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच सौ. प्रतिभा अविनाश देशमुख यांच्यासह तीन वर्गातील नऊ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध झालेले आहेत. भगत विक्रम विष्णू, महारनवर शुभांगी अजित, भोसले प्रियांका भाऊसाहेब, धुमाळ जयश्री दीपक, देशमुख अनंतराव हरिबा, जगदाळे रूपाली महेश, जगदाळे ज्ञानेश्वर विठ्ठल, भगत अस्मिता योगेश, जगदाळे मनीषा सतिश असे सदस्य बिनविरोध निवड झाले असून निवडणूक निर्णय अधिकारी एस. पी. खंडागळे यांनी काम पाहिले.

देशमुखवाडी ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतील सरपंच व सदस्य यांच्या बिनविरोध निवडीने समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे. गावातील आपापसांतील गटतट, पक्षभेद बाजूला सारून एकाच घोंगडीवर बसून गावाने लोकनियुक्त थेट जनतेतील सरपंच व नऊ सदस्य यांची बिनविरोध निवड केलेली असल्याने हे कौतुकास्पद झालेले आहे‌.

गावामध्ये चौफेर विकास करण्याकरता सर्वांची एकजूट कामी येणार आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, राज्य सरकार व केंद्र सरकार विकास कामे करण्याकरता निधीची कमतरता पाडणार नाही. नेते मंडळी व ग्रामस्थ यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे‌ या निर्णयाचे कौतुक केले जात आहे‌

माळशिरस तालुक्यात दहा ग्रामपंचायतींची निवडणूकीचे तहसीलदार सुरेश शेजुळ, निवासी नायब तहसीलदार अमोल कदम, महसूल नायब तहसीलदार सायली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीचे अव्वल कारकून हरी भाकरे योग्य नियोजन करीत आहेत. यावेळी नवनियुक्त थेट जनतेतील सरपंच प्रतिभा अविनाश देशमुख यांचा सन्मान महसूल नायब तहसीलदार सायली जाधव यांनी करून सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये बारामती झटका न्यूज संपादक श्रीनिवास कदम पाटील 9850104914 हा नंबर समाविष्ट करावा..

Related Articles

27 Comments

  1. An impressive share, I just given this onto a colleague who was doing a little analysis on this. And he in fact bought me breakfast because I found it for him.. smile. So let me reword that: Thnx for the treat! But yeah Thnkx for spending the time to discuss this, I feel strongly about it and love reading more on this topic. If possible, as you become expertise, would you mind updating your blog with more details? It is highly helpful for me. Big thumb up for this blog post!

  2. Hi, just required you to know I he added your site to my Google bookmarks due to your layout. But seriously, I believe your internet site has 1 in the freshest theme I??ve came across. It extremely helps make reading your blog significantly easier.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button