ताज्या बातम्या

केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीवर बारामती झटका चे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांची नियुक्ती.

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, महाविजय संयोजन प्रमुख आ. श्रीकांतजी भारतीय, माढा लोकसभेचे कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळे संधी मिळाली.

माळशिरस (बारामती झटका)

भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, भाजपचे महाविजय संयोजन प्रमुख आमदार श्रीकांतजी, भारतीय माढा लोकसभेचे कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळे बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनल चे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांना केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्य पदावर मुंबई महाप्रबंधक कार्यालयातील उपमहाप्रबंधक तथा सचिव क्षेत्रीय रेल्वे उपयोगकर्ता परामर्शदात्री समितीचे सचिव अभय मिश्रा यांनी पत्राद्वारे कळविलेले आहे.

श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मु. पो. मळोली, ता. माळशिरस, जि. सोलापूर, यांनी गेल्या १४ वर्षापासून ग्रामीण भागामध्ये पत्रकारितेला सुरुवात करून समाजामधील सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी प्रसारमाध्यमातून मांडून सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या जनहिताच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम केलेले आहे. प्रशासन व जनता यांच्यामधील दुवा म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्कृष्ट प्रकारे कार्य करण्याचा प्रयत्न कायम केलेला आहे. इंग्रज कालीन लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वे चा प्रश्न रखडलेला होता. केंद्रात व राज्यात भाजपच्या विचाराचे सरकार असल्याने लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वेचा प्रश्न सुटावा यासाठी वार्तांकन केलेले होते. सोशल मीडियाच्या समाज माध्यमातून केंद्र व राज्य सरकारपर्यंत रेल्वे मार्ग झाल्यानंतर अखंड हिंदुस्तानच्या वैष्णवांचे दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी भाविकभक्तांची सोय होऊन सातारा, सोलापूर जिल्ह्यातील दळणवळणाचा प्रश्न मिटून उद्योग व्यवसाय व शेतकऱ्यांच्या शेतीमालाला वाहतूक करण्याकरता सुखसुविधा उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा, इतर ठिकाणी शाळेला ये जा करता यावी असे अनेक मुद्दे घेऊन इंग्रजकालीन रखडलेली रेल्वे पूर्ण होण्याकरता सातत्याने पाठपुरावा करणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस व माढा लोकसभेचे कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे रेल्वे सुरू करण्याविषयीची तळमळ समाज माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केलेले असल्याने बारामती झटका चे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांना सल्लागार समितीवर काम करण्याची संधी मिळालेली आहे.

संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी सदरचे पत्र फेसबुक व स्टेटसला ठेवल्यानंतर मित्रपरिवार व नातेवाईक यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला होता. कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या संपर्क कार्यालयातून अभिनंदनचा फोन आलेला होता. माढा लोकसभेचे कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते, भारतीय जनता पक्षाचे सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब उर्फ चेतनसिंह केदार सावंत, भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भाजपचे प्रांतिक सदस्य व सोलापूर जिल्ह्याचे सहप्रभारी के. के. पाटील, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, भाजपच्या महिला सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षा सौ. ज्योतीताई पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोरभैय्या सुळ पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आंदोलनवीर अजितभैया बोरकर, निरा-देवधर उर्वरित संघर्ष समितीचे अध्यक्ष जलनायक शिवराज भैय्या पुकळे, भाजपचे माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजयजी देशमुख, युवा मोर्चाचे माजी तालुका अध्यक्ष प्रा. दादासाहेब खरात, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष युवराज वाघमोडे, गोरडवाडीचे युवा सरपंच विष्णूभाऊ गोरड, सदाशिवनगरचे सोज्वळ व्यक्तिमत्व सुभाष सुज्ञे उर्फ हरीओम यांच्यासह अनेकांनी प्रत्यक्ष व फोनवरून शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये बारामती झटका न्यूज संपादक श्रीनिवास कदम पाटील 9850104914 हा नंबर समाविष्ट करावा..

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button