ताज्या बातम्याराजकारण

दमदार आमदार रामभाऊ सातपुते यांचा विकास पाणीदार आमदार जयाभाऊ गोरे यांचे नियोजन मोहिते पाटलांचे मताधिक्य रोखणार….

माळशिरस (बारामती झटका)

माढा लोकसभा मतदार संघात महायुतीचे अधिकृत उमेदवार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर व महाविकास आघाडीचे धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील यांच्या चुरशीच्या निवडणुकीत मोहिते पाटील यांच्या हक्काच्या माळशिरस तालुक्यात भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा दमदार विकास आणि मान खटाव चे कर्तव्यदक्ष पाणीदार आमदार जयाभाऊ गोरे यांच्या तालुक्यातील योग्य नियोजनामुळे मोहिते पाटलांचे मताधिक्य रोखले जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सहकार्याने माढा लोकसभा मतदारसंघात अनेक प्रलंबित सिंचन प्रकल्प, रेल्वे, रस्ते व इतर विकास कामे केलेली असल्याने महायुतीने माढा लोकसभा मतदारसंघात पुनश्च उमेदवारी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर केल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करून महाविकास आघाडीची उमेदवारी धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतलेली होती. मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केल्यानंतर माढा लोकसभा निवडणुकीत रंगत वाढलेली होती. मोहिते पाटील यांच्या विरोधात पारंपारिक मोहिते पाटील विरोधी गटातील अनेक नेते व कार्यकर्ते यांनी मोहिते पाटील गटाला साथ दिलेली होती त्यामुळे माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील यांचे सुरुवातीच्या काळात पारडे जड झालेले होते.

माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांना सोलापूर लोकसभा मतदार संघाची महायुतीची उमेदवारी मिळालेली असल्याने आमदार राम सातपुते सोलापूर येथील निवडणुकीत व्यस्त होते. माळशिरस तालुक्यात विविध योजनेतून प्रलंबित विकास कामे करून माळशिरस तालुक्याचा बॅकलॉग भरून काढलेला होता. मोहिते पाटील व मोहिते पाटील विरोधी गटातील अनेक नेते व कार्यकर्ते आमदार राम सातपुते यांच्या विकासकामांवर समाधानी असल्याने भाजपकडे आकर्षित झालेले होते.

माळशिरस तालुक्यात लोकप्रतिनिधींची कमतरता भासू नये यासाठी मान खटाव चे कर्तव्यदक्ष पाणीदार आमदार जयकुमार गोरे उर्फ जया भाऊ यांनी योग्य नियोजन केलेले होते. माळशिरस तालुक्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच माळी समाजाची मोळी मोहिते पाटील यांच्या विरोधात बांधण्यामध्ये जयाभाऊ यशस्वी झालेले होते. माळी समाजाबरोबर इतर जाती धर्मातील लोकांना हाताशी धरून माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील विरोधी सर्वांची मोट बांधलेली होती. मोहिते पाटील यांना माळशिरस तालुक्यातून दीड लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेण्याचा मनसुबा होता. मात्र, लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यात केलेला विकास आणि माण-खटावचे पाणीदार आमदार जयाभाऊ गोरे यांचे योग्य नियोजन यामुळे मोहिते पाटलांचे मताधिक्य रोखणार आहेत. गतवेळच्या निवडणुकीत मोहिते पाटील यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना एक लाखापेक्षा जास्त लीड दिले अशी वल्गना कायम करीत होते. खरंच, त्यांनी लीड दिल असेल तर स्वतःला सुद्धा तेवढेच लीड मिळाले पाहिजे, असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे चार जून रोजी निकालाकडे मतदारांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort