ताज्या बातम्याराजकारण

मेडद पंचायत समिती गणातील भाजप व महायुतीच्या नेते व कार्यकर्त्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन..

मा. आ. राम सातपुते यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती, मेडद पंचायत समिती गणाचे लोकप्रिय नेतृत्व नाथाआबा लवटे पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित राहणार…

माळशिरस (बारामती झटका)

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार दि. १६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ०६ वाजता संग्रामनगर जिल्हा परिषद गटातील मेडद पंचायत समिती गणातील भाजप व महायुतीच्या नेते व कार्यकर्त्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन मेडद पंचायत समिती गणाचे लोकप्रिय नेतृत्व व माजी सरपंच भाजपचे नेते नाथाआबा लवटे पाटील यांच्या निवासस्थानी स्नेह मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. सदरच्या कार्यक्रमासाठी गणातील नेते व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत…

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहेत. लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या श्रीराम बंगला निवासस्थानी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणातील प्रत्येक गावांच्या नेते व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत. मेडद पंचायत समिती गणातील व मेडद गावातील कार्यकर्त्यांनी नाथाआबा लवटे पाटील यांच्या उमेदवारीची मागणी केलेली होती. गणातील नेते व कार्यकर्त्यांचा सुसंवाद व्हावा, यासाठी स्नेह मेळाव्याचे आयोजन केलेले आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom