ताज्या बातम्यासामाजिक

मा. आमदार राम सातपुते यांची मोटेवाडी माळशिरस येथील माने परिवार यांची सांत्वनपर भेट….

मोटेवाडी माळशिरस ग्रामपंचायत सदस्य श्री. महादेव पंढरी माने व आप्पासो पंढरी माने यांना पितृशोक…

माळशिरस (बारामती झटका)

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार मा. आमदार राम सातपुते यांनी मोटेवाडी माळशिरस येथील रेशन दुकानदार पंढरी नामदेव माने यांचे वयाच्या 56 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेले होते. मोटेवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य श्री. महादेव माने व प्रगतशील बागायतदार श्री. आप्पासो माने यांच्यासह माने परिवार यांची सांत्वनपर भेट घेतली. स्वर्गीय पंढरी नामदेव माने यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले..

स्व. पंढरी नामदेव माने यांनी पंधरा वर्ष रेशन दुकान चालवलेले आहे. गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या मुखामधील घास कधीही कमी पडू दिला नाही. त्यांचा सौजन्यशील व प्रामाणिक स्वभाव असल्याने जनतेमध्ये कायम त्यांना आदराचे स्थान होते. महादेव व अप्पासो यांनी समाजामध्ये आपल्या वागण्यातून चांगले स्थान निर्माण केलेले आहे.

स्वर्गीय पंढरी माने यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा विशेष करून कुस्ती शौकीन, ग्रामस्थ, मित्रपरिवार व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माने परिवार यांच्या दुःखात मा. आमदार राम सातपुते यांनी सांत्वनपर भेट घेऊन धीर दिलेला आहे..

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button